AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली, किसान सन्मान निधीचे पैसे उद्या खात्यात जमा होणार

PM Kisan Samman Nidhi Yojana 15th installment : शेतकऱ्यांच्या खात्यात बुधवारी पीएम किसान योजनेची रक्कम हस्तांतरित केली जाणार आहे. पीएम किसान सन्मान निधीचे पैसे तुमच्या खात्यात आले आहेत की नाही हे कसे तपासायचे? जाणून घ्या.

शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली, किसान सन्मान निधीचे पैसे उद्या खात्यात जमा होणार
PM kisan yojna
| Updated on: Nov 14, 2023 | 7:53 PM
Share

PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी असलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या नवीन हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट पुढे आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 15 नोव्हेंबर 2023 रोजी शेतकऱ्यांसाठी चालवल्या जाणार्‍या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 18,000 कोटी रुपयांचा 15 वा हप्ता जारी करणार आहेत. ज्याचा 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना फायदा होईल.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात. शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे थेट जमा होतात. ही रक्कम प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली जाते. केंद्र सरकारने 27 जुलै 2023 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता जारी केला होता. या योजनेंतर्गत आतापर्यंत 14 हप्त्यांमध्ये 2.62 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11:30 वाजता खुंटी, झारखंड येथून शेतकऱ्यांना 15 वा हप्ता हस्तांतरित करतील.

पैसे आले की नाही कसे तपासावे

  • प्रथम PM किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.
  • तुम्हाला उजव्या बाजूला फार्मर्स कॉर्नरचा पर्याय दिसेल.
  • Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा.
  • नवीन पेज उघडल्यानंतर आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यांपैकी एक पर्याय निवडा. या तीन क्रमांकांद्वारे
  • तुम्ही तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तपासू शकता.
  • तुम्ही निवडलेल्या पर्यायाचा नंबर टाका. यानंतर Get Data वर क्लिक करा.
  • येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व व्यवहारांची माहिती मिळेल.
  •  जर तुम्हाला FTO जनरेट झाले आहे आणि पेमेंट कन्फर्मेशन पेंडिंग लिहिलेले दिसत असेल तर याचा अर्थ तुमच्या रकमेवर प्रक्रिया होत आहे.
  • जर तुम्हाला PM किसान सन्मान निधी हप्त्याची स्थिती SMS द्वारे तपासायची असेल, तर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून “STATUS” लिहून 8923020202 वर पाठवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला एक एसएमएस मिळेल. यामध्ये तुम्हाला हप्त्याच्या स्थितीबद्दल माहिती दिली जाईल.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.