तुम्हीही करताय FDs तर पटापट चेक करा ताजे रेट्स, ‘या’ बँकेने व्याज दरांमध्ये केले बदल

कोटक महिंद्रा बँकेने (Kotak Mahindra Bank) फिक्स्ड डिपॉझिटवरील (Fixed Deposite) व्याज दरात बदल केला आहे. बँकेकडून ग्राहकांना 2.50 टक्के ते 5.30 टक्के व्याज मिळत आहे.

तुम्हीही करताय FDs तर पटापट चेक करा ताजे रेट्स, 'या' बँकेने व्याज दरांमध्ये केले बदल
तुम्हाला दरमहा 68 लाख रुपये मिळतील – एनपीएसमध्ये मासिक गुंतवणूक – 5,000 रुपये. 30 वर्षांत एकूण योगदान – 18 लाख रुपये. गुंतवणुकीवर अंदाजित परतावा – 10%

नवी दिल्ली : आपल्याकडे एफडी असल्यास, ही बातमी तुमच्यासाठी आहे. कोटक महिंद्रा बँकेने (Kotak Mahindra Bank) फिक्स्ड डिपॉझिटवरील (Fixed Deposite) व्याज दरात बदल केला आहे. बँकेकडून ग्राहकांना 2.50 टक्के ते 5.30 टक्के व्याज मिळत आहे. याशिवाय बँक 7 दिवस ते 10 वर्षाच्या एफडी मिळवण्याची सुविधा ग्राहकांना देत आहे. आपण देखील निश्चित ठेव मिळवण्याची योजना आखत असल्यास आधी बँकेचे दर चेक करा. (fd interest rates kotak mahindra bank revises fixed deposit rates)

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँक 7 ते 30 दिवस, 31 ते 90 दिवस आणि 91 ते 179 दिवसांमध्ये परिपक्व एफडीवर अनुक्रमे 2.5 टक्के, 2.75 टक्के आणि 3.25 टक्के व्याज दर देत आहे. याशिवाय 180 दिवसांत एफडी मॅच्युरिंगवर 4.40 टक्के व्याज दिले जात आहे. वर्षामध्ये 389 दिवसांपर्यंतच्या ठेवींसाठी बँक 4.50 टक्के भरते.

बँक एफडीचे दर काय आहेत वाचा…

– 7- 30 दिवस – 2.50%

– 31- 90 दिवस – 2.75%

– 91- 179 दिवस – 3.25%

– 180 दिवस – 4.40%

– 181 दिवस ते 364 दिवस – 4.40%

– 365 दिवस ते 389 दिवस – 4.50%

– 390 दिवस (12 महिने 25 दिवस) – 4.90%

– 391 दिवस – 4.90%

– 23 महिने ते 3 वर्ष – 5%

– 3 वर्ष आणि त्यावर आणि त्यावर अधिक 4 वर्षांहून कमी – 5.10%

– 4 वर्ष आणि त्यावर अधिक 5 वर्षांहून कमी – 5.25%

– 5 वर्ष ते 10 वर्ष – 5.30%

ज्येष्ठ नागरिकांना किती व्याज मिळेल?

या व्यतिरिक्त बँक ज्येष्ठ नागरिकांना सर्वसामान्यांपेक्षा 50 बेसिस पॉईंट अधिक व्याज देत आहे. बँक ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतची एफडी देत ​​आहे. यावर ग्राहकांना 3 टक्क्यांवरून 5.8 टक्क्यांपर्यंतचे व्याज मिळेल. (fd interest rates kotak mahindra bank revises fixed deposit rates)

संबंधित बातम्या – 

अ‍ॅमेझॉनवर Holi ची धमाकेदार ऑफर, या स्मार्टफोन्सवर मिळतेय बंपर सूट

Bank Holidays : एप्रिलमध्ये 15 दिवस बंद राहणार बँका, इथे वाचा संपूर्ण लिस्ट

फोनपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा Pulsar, Passion आणि Hero Karizma, वाचा काय आहे ऑफर

(fd interest rates kotak mahindra bank revises fixed deposit rates)

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI