‘या’ खास टिप्स वापरून पैसे ठेवा सुरक्षित, नाहीतर एका फोनमध्ये तुमचं अकाऊंट होईल रिकामं

तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डच्या वापरासंबंधी काही महत्त्वाच्या सूचना लक्षात घेतल्या पाहिजेत.

'या' खास टिप्स वापरून पैसे ठेवा सुरक्षित, नाहीतर एका फोनमध्ये तुमचं अकाऊंट होईल रिकामं

नवी दिल्ली : कोरोनाच्या या जीवघेण्या संकटामध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये भयंकर वाढ झाली आहे. बँकेच्या फसवणूकीचे अनेक प्रकार सतत समोर येत आहेत. म्हणूनच, बँकिग सुरक्षेकडे लक्ष देणं फार महत्वाचं झालं आहे. कारण, झारखंडच्या देवघर जिल्ह्यात पोलिसांनी छापा टाकून तब्बल 12 सायबर गुन्हेगारांना अटक केली आहे. बँकेचे अधिकारी आहे असं सांगून हे गुन्हेगार केवायसी अपडेट्स (KYC update) आणि एटीएम कार्ड (ATM Card) ब्लॉक झालं म्हणून अपडेट करण्यासाठी ओटीपी (OTP) मागायचे आणि ग्राहकांची लूटमार करायचे. यामुळे अनेक ग्राहकांचे बँक खात्यातून पैसे गायब झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डच्या वापरासंबंधी काही महत्त्वाच्या सूचना लक्षात घेतल्या पाहिजेत. (follow these safety tips to save your money otherwise one phone call can empty you bank account balance)

सायबर गुन्ह्यांपासून कसे वाचाल?

खरंतर, वारंवार होणाऱ्या बँकिंग घोटाळ्यांविषय बँक वारंवार त्यांच्या ग्राहकांना अलर्ट करत असते. बँकेच्या नावाने खोटे ई-मेल आणि फोन करून पैशांची लूट करणाऱ्या अनेक टोळ्या सक्रिय आहेत. यामुळे ग्राहकांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशात देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक एसबीआयने सुरक्षित व्यवहार आणि फसवणूक करणार्‍यांना ओळखण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत.

SBI ने दिलेल्या महत्त्वाच्या टीप्स

– कोणत्याही व्यक्तीला वैयक्तिक माहिती देऊ नका

– तुमच्या खात्याचा पासवर्ड सतत बदला.

– इंटरनेट बँकिंगचे कोणतेही तपशील फोन, ईमेल किंवा एसएमएसवर शेअर करू नका

– संशयास्पद मेसेजवर किंवा लिंकवर कधीही क्लिक करू नका

– कोणत्याही बँकेशी संबंधित माहितीसाठी नेहमी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून माहिती घ्या.

– फसवणूक झाली असेल तर तात्काळ स्थानिक पोलीस अधिकारी किंवा नजीकच्या शाखेत तक्रार नोंदवा.

एटीएममध्ये सुरक्षित बँकिंगसाठी महत्त्वाच्या टिप्स

– एटीएम किंवा पीओएस मशीनवर एटीएम कार्ड वापरताना कीपॅड झाकण्यासाठी हाताचा वापर करा.

– तुमच्या कार्डचा पिन किंवा माहिती कधीही शेअर करू नका.

– कार्डवर कधीही पिन लिहून ठेऊ नका.

– तुमच्या कार्डची माहिती विचारली असता पिनसाठी ईमेल, एसएमएस किंवा फोनला उत्तर देऊ नका.

– तुमच्या व्यवहाराची पावती कुठेही फेकू नका

इतर बातम्या – 

रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, 25 दिवसांत बदलणार Debit-Credit चा नियम

नियम बदलले! ‘या’ दोन बँकांच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी आता OTP ची गरज

(follow these safety tips to save your money otherwise one phone call can empty you bank account balance)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI