AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GST मुळे अन्न-कपड्यांचे दर घसरले, आता आरबीआय EMI कमी करणार? काय आहे ती अपेडट

RBI Repo Rate EMI : केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा शुल्कात (GST) कपातीचा निर्णय घेतल्याने दैनंदिन वस्तू स्वस्त झाल्या आहेत. अन्न पदार्थांसह कपडे, विमा सर्व स्वस्त झाले आहेत. स्वस्त सामानानंतर आता अजून एक भेट नागरिकांना मिळण्याची शक्यता आहे.

GST मुळे अन्न-कपड्यांचे दर घसरले, आता आरबीआय EMI कमी करणार? काय आहे ती अपेडट
आरबीआयकडून गिफ्ट
| Updated on: Sep 16, 2025 | 2:20 PM
Share

Home Loan Interest Rate : केंद्र सरकारने जीएसटीमध्ये कपातीचे धोरण लागू केले. त्यामुळे दैनंदिन वापरातील अनेक वस्तू स्वस्त झाल्या. त्यात अन्न पदार्थांसह कपडे, विमा सर्व स्वस्त झाले. लवकरच गृहकर्जावरील ईएमआय (RBI Repo Rate EMI) सुद्धा कमी होण्याची शक्यता आहे. आरबीआय रेपो दरात कपात करून ग्राहकांना स्वस्त कर्जाची भेट देऊ शकते. तर अनेकांचा ईएमआय अजून कमी होऊ शकतो. काही वृत्तानुसार, आरबीआय येत्या महिन्यात रेपो दरात 50 बेसिस पाईंटची कपात करू शकते. पतधोरण समितीची पुढील महिन्यात बैठक होत आहे. दिवाळीचा डबल धमाका करण्यासाठी आता आरबीआयने कंबर कसल्याचे बोलले जात आहे.

किरकोळ महागाई आटोक्यात?

किरकोळ महागाई दर येत्या काही दिवसात कमी होण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह बँकचे रेपो दर 50 आधार अंकांपर्यंत घसरेल, असा अंदाज प्रसिद्ध संस्था मॉर्गन स्टेनलीने केली आहे. अन्नधान्याच्या किंमती घसरल्या आहेत. जीएसटी कपातीचा फायदा मिळत आहे. वस्तूंच्या किंमती कमी झाल्यामुळे महागाईचा तोरा कमी होण्याची शक्यता स्टेनलीच्या अहवालात वर्तवण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2026 मध्ये तर महागाई दर सरासरी 2.4 टक्के राहील असा दावा स्टेनलीच्या अहवालात करण्यात आला आहे. त्यामुळे आरबीआय ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात प्रत्येकी 25 आधारावर एकूण 0.50 टक्के रेपो दर कपात करेल, असा या प्रसिद्ध संस्थेचा अंदाज आहे.

या अहवालानुासर, गेल्या सात महिन्यांपासून किरकोळ महागाई दर आरबीआयच्या लक्षित 4 टक्क्यांच्या उद्दिष्टांपेक्षा कमी आहे. त्याचे एक कारण खाद्यपदार्थांच्या किंमतीत आलेली घसरण हे सुद्धा आहे. पण मूळ महागाई दर अद्याप 4.2 टक्क्यांच्या घरात आहे. तर गेल्या 22 महिन्यात मूळ महागाई दर हा 3.1 टक्क्यांवर आणि 4 टक्क्यांपेक्षा कमी होता.

रेपो दर कपातीला ब्रेक

आरबीआयने 2025 पासून रेपो दर कपात केली. यापूर्वी फेब्रुवारी आणि एप्रिल 2025 महिन्यात रेपो दरात 0.25-0.25 टक्के कपात करण्यात आली होती. त्यामुळे रेपो दर 6.50 वरून 6 टक्क्यांवर आला होता. आता त्यात 0.50 टक्क्यांची कपात झाल्याने रेपो दर 5.5 टक्क्यांवर आला आहे. पण यावेळी ऑगस्ट महिन्यात या दर कपात धोरणाला ब्रेक लावण्यात आला. आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात त्यात प्रत्येकी 0.25 टक्क्यांची कपात होण्याची शक्यता आहे.

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....