AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhananjay Munde : वंजारी-बंजारा वाद; धनंजय मुंडेचा तो मोठा खुलासा, माफी मागितली का?

Dhananjay Munde onVanjari-Banjara controversy : वंजारी आणि बंजारा हे एकच आहे, अशा आशयाच्या वक्तव्यावरून वाद पेटला. जालना येथील त्यांच्या या वक्तव्यावरून बंजारा समाज संतापला आहे. त्यावर आता माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठा खुलासा केला आहे.

Dhananjay Munde : वंजारी-बंजारा वाद; धनंजय मुंडेचा तो मोठा खुलासा, माफी मागितली का?
वंजारी-बंजारा वाद
| Updated on: Sep 16, 2025 | 1:42 PM
Share

Vanjari-Banjara controversy : बंजारा समाजाला तेलंगणा आणि राजस्थानमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गात येतात. आम्ही सुद्धा तिकडे एसटी प्रवर्गातच आहोत. बंजारा आणि वंजारा वेगवेगळे आहेत का? असे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी सोमवारी जालना येथील बंजारा समाजाच्या मोर्चाला संबोधित करताना केले होते. वंजारी आणि बंजारा हे एकच आहे, अशा आशयाच्या वक्तव्यावरून वाद पेटला. त्यावर आता माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठा खुलासा केला आहे. काय म्हणाले मुंडे?

वंजारा-बंजारा वादावर काय मत?

कोणी काय विरोध करावा हे माझ्या हातात नाही. मुद्दा हा आहे की स्थानिक पातळीवर आम्ही कशा पद्धतीने राहतो हा आहे. बोलताना, वागताना बंजारा आणि वंजारा जात म्हणून वेगळी आहे. बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या आहे. पण आम्ही बोलताना आज पासून नाहीतर स्वर्गीय मुंडे साहेबपासून या बंजारा समाजाने खूप प्रेम केले आहे. त्या परिस्थितीमध्ये मी ते बोललेलो आहे, असा खुलासा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केला.

भाषणामध्येच घोषणा देणारे कोण होते ते सुद्धा बऱ्यापैकी सोशल मीडियावर बाहेर आलेल्या आहे. त्यामुळे लक्षात घ्या, कुठेतरी एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागावं आणि तो कार्यक्रम एकीकडे चांगला कार्यक्रम तुम्हाला दाखविता येत नाही माध्यमांना काय तर झाले पाहिजे ना. त्याच्याशिवाय तुमचा टीआरपी वाढत नाही, असे मत मुंडेंनी व्यक्त केले.

अशी जी काही आहेत विघ्न संतोषी लोक ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करतात आत्ता इथे बरेच बंजारा समाजाचे लोक आहेत त्यांना जर विचारलं की बंजारा म्हणजे काय तर ते सांगितलं. स्थानिक पातळीवर बोलताना, वागताना आम्ही बंजारा-वंजारा बोलतो, कारण आम्ही भटके आहोत, असे ते म्हणाले.

अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान

अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पूरग्रस्त भागाची माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी अनेक गावात जाऊन पाहणी केली. परळी तालुक्यातील दोन दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे अनेक रस्ते खचले पूल वाहून गेले शेतीचे नुकसान झाले अशा गावांना माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पाहणी केली व प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले.

काल झालेल्या पावसामुळे परळी तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीचा नुकसान 100% झालेला आहे. यापूर्वी 50% नुकसान झालं होतं. हा कापूस पूर्णपणाने पाण्यात आहे. या कापसाचं या शेतकऱ्याला एक रुपयाचं उत्पन्न मिळू शकत नाही. काल अजित दादांना विनंती केल्यानंतर त्यांनी तात्काळ कलेक्टर यांना आदेश देऊन तहसीलदारांना सर्व क्षेत्र अतिवृष्टी खाली घ्या तसा आदेश दिलेला आहे. एकीकडे ज्या नदीपात्राच्या बाजूला असणाऱ्या जमीन आहेत ते खरडून गेले आहेत. त्याचे फार मोठे नुकसान झालं आहे. त्याबाबतही निर्णय घेण्याचं मी प्रशासनाला सांगितलं आहे, अशी माहिती मुंडे यांनी दिली.

अनेक गावांचा संपर्क तुटला आहे अनेक पूल वाहून गेले आहेत त्या मुलांना तात्काळ नव्याने उभारणी करावी लागणार आहे. अनेक अतिवृष्टी पाहिल्या पण या अतिवृष्टीमध्ये मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यामध्ये ही अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.

परळी-बीड-नगर रेल्वेच्या पहिल्या टप्प्याचे उद्धघाटन

परळी बीड नगर रेल्वे च्या पहिल्या टप्प्याचं नगर पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री, मंत्री पंकजाताई मुंडे अनेक मान्यवर नेते येणार आहेत. दहा वर्षाच्या कालावधीमध्ये खासदार असलेल्या प्रीतम मुंडे देखील येणार आहेत. त्यांनी सुद्धा फार कष्ट रेल्वे येण्यासाठी घेतले आहे. आणि आज बीड करांचा अर्थ स्वप्न पूर्ण झाले आहे आणि परळी पासून ते बीड पर्यंतचे अर्ध स्वप्न काय येणाऱ्या वर्षभरामध्ये पूर्ण करण्याच्या संबंधित स्वतः अजितदादा पवार यांनी लक्ष घातलं असल्याचे मुंडे म्हणाले.

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.