AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Keshub Mahindra : अब्जाधीश उद्योगपती केशब महिंद्रा यांचे निधन; मृत्यूनंतर किती कोटीची संपत्ती सोडलीय माहितीय?

प्रसिद्ध उद्योगपती केशब महिंद्रा यांचं वयाच्या 99व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांनी तब्बल चार दशके महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचं नेतृत्व केलं. त्यांनी अनेक सरकारी समित्यांवर कामही पाहिलं.

Keshub Mahindra : अब्जाधीश उद्योगपती केशब महिंद्रा यांचे निधन; मृत्यूनंतर किती कोटीची संपत्ती सोडलीय माहितीय?
Keshub MahindraImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 12, 2023 | 1:28 PM
Share

नवी दिल्ली : भारतातील सर्वात वयोवृद्ध अब्जाधीश आणि महिंद्रा अँड महिंद्राच्या एमेरिटस चेअरमन केशब महिंद्रा यांचं आज निधन झालं. वयाच्या 99 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फोर्ब्सच्या नुकत्याच जारी झालेल्या अब्जाधीशांच्या यादीत ते 16व्या स्थानी होते. त्यांनी त्यांच्या मागे 1.2 अब्ज डॉलरची म्हणजे 98,463,598,800.00 रुपयांची संपत्ती सोडली आहे. त्यांनी 48 वर्ष महिंद्रा ग्रुपचं नेतृत्व केलं होतं. 2012मध्ये त्यांनी चेअरमनपद सोडलं होतं. त्यांच्या निधनाने उद्योगजगतातून हळहळ व्यक्त होत आहे.

दिवंगत केशब महिंद्रा यांचा जन्म 9 ऑक्टोबर 1923 रोजी झाला होता. त्यांनी 1947मध्ये त्यांच्या वडिलांच्या कंपनीत काम करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर 1963मध्ये त्यांना महिंद्रा ग्रुपचे चेअरमन बनवण्यात आळं होतं. केशब महिंद्रा हे उद्योगपती आनंद महिंद्रा यांचे चुलते होते. वयाच्या 99व्या वर्षीही ते महिंद्रा अँड महिंद्राचे ते चेअरमन एमेरिटस होते. 2012मध्ये ग्रुपच्या चेअरमन पदावरून निवृत्त झाल्यानंतर आनंद महिंद्रा यांच्याकडे ही जबाबदारी आली होती.

केशब महिंद्र यांच्या निधनाने उद्योग जगतातून शोक व्यक्त केला जात आहे. वयाची शंभरी गाठण्यापूर्वीच ते फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत आले होते. त्यामुळे ते चर्चेत आले होते. केशब महिंद्रा यांनी पेन्सिलवेनिया विद्यापीठातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. 1963मध्ये कंपनीची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी कंपनीला यशोशिखरावर नेले. त्यांनी आपल्या कार्यकाळात युटिलिटीशी संबंधित वाहनांच्या निर्मितीची ग्रोथवर भर दिला होता. विलीज जीपला वेगळी ओळख देण्याचं काम त्यांनी केलं.

माझे प्रेरणास्त्रोत

भारतीय राष्ट्रीय अंतराळ संवर्धन आणि प्राधिकरण केंद्राचे अध्यक्ष पवन गोयंका यांनी महिंद्रा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. औद्योगिक जगताने आज सर्वात मोठ्या व्यक्तीला गमावले आहे. केशब महिंदा यांना तोड नाही. सर्वात चांगल्या व्यक्तीला जाणून घेण्याचं सौभाग्य मला मिळालं. मी नेहमीच त्यांना भेटण्यासाठी उत्सुक असायचो. मला त्यांच्यापासून प्रेरणा मिळायची, असं गोयंका यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या

केशब महिंद्रा यांनी एमआरटीपीसह सेंट्रल अॅडव्हाजरी कौन्सिल ऑफ इंडस्ट्रीजसहीत विविध सरकारी समित्यांवर काम केलं आहे. 2004 ते 2010पर्यंत ते पंतप्रधानांच्या व्यापार आणि उद्योग परिषदेचे सदस्य होते. त्यांनी टाटा स्टिल, टाटा केमिकल्स, आयसीआयसीआय, आयएफसी, सेल आणि इंडियन्स हॉटेल्स आदी कंपन्याच्या बोर्ड आणि कौन्सिवर काम केलं.

पुरस्कारांनी सन्मानित

उद्योग जगतात दिलेल्या प्रचंड योगदानाबद्दल केशब महिंद्रा यांना 2007मध्ये अर्न्स्ट अँड यंगकडून लाइफ टाइम अचिव्हमेंट पुरस्कार मिळाला. 1987मध्ये त्यांना फ्रान्स सरकारने शेवेलियर डी ल’ऑर्ड्रे नेशनल डे ला लीजन डी’होनूर पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.