AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

786 Note Value : 786 क्रमांकाची नोट विका आणि मालामाल व्हा; काय आहे ट्रिक्स?

रमजानचा महिना असल्याने एका संकेतस्थळाने एक ऑफर दिली आहे. 786 क्रमांकाची नोट किंवा नाणी दिल्यास तुम्हाला भरपूर पैसे मिळू शकणार आहे. त्यासाठी तुम्हाला या साईटवर जाऊन तुमच्या नावाची नोंदणी करावी लागणार आहे.

786 Note Value : 786 क्रमांकाची नोट विका आणि मालामाल व्हा; काय आहे ट्रिक्स?
786 Note ValueImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 12, 2023 | 7:57 AM
Share

मुंबई : अनेकांना झटपट मालामाल व्हावसं वाटतं. एका झटक्यात आपल्याकडे गाडी, बंगला असावा असं सर्वांनाच वाटतं. त्यामुळे प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने पैसे गुंतवण्याचे मार्ग चोखळत असतो. काही लोक लॉटरी काढतात, काही लोक शेअर बाजारात पैसा गुंतवतात. तर काही लोक पैसे डबल करून देणाऱ्या स्किममध्ये पैसे गुंतवतात. त्यातून काहींना लाभ होतो. तर काहींचं नुकसान होतं. काहींची तर फसवणूकही होते. मात्र तुम्हाला जर नोटा किंवा नाणी गोळा करण्याचा छंद असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुमच्याकडे 786 सीरीजची नोट असेल तर तुम्ही घर बसल्या लाखो रुपये कमावू शकता. घर बसल्या मालामाल होऊ शकता. रमजानच्या महिन्यात ही खास ऑफर देण्यात आली आहे.

786 सीरिजची रेअर नोट किंवा नाण्यांचं तुमच्याकडे कलेक्शन असेल तर ई कॉमर्स वेबसाईट ईबायकडून तुम्हाला घसघशीत रक्कम मिळू शकते. जर तुमच्याकडे 786 क्रमांकाची नोट असेल तर तुम्हीही लाखो रुपये कमावू शकता. eBay ने ही ऑफर 5, 10, 20, 50, 100 रुपयांच्या नोटांवर दिली आहे.

अशी करा नोटांची विक्री

1. नोटा विकण्यासाठी तुम्ही सर्वात आधी www.ebay.com संकेतस्थळाला भेट द्या.

2. इथे होमपेजवर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करा आणि एक सेलर म्हणून स्वत:ची नोंदणी करा

3. आता तुमच्याकडील 786 क्रमांक असलेल्या नोटांचा फोटो काढा आणि तो संकेतस्थळावर अपलोड करा

4. त्यानंतर Ebay तुमची ही जाहिरात दुर्मिळ नोटा खरेदी करणाऱ्यांन दाखवेल, जुन्या नोटा आणि नाणी खरेदी करणारे अशा संकेतस्थळाचा वापर करतात. ते तुमची नोट पाहून तुमच्याशी संपर्क साधतील.

5. ज्या लोकांना या क्रमांकाची नोट खरेदी करण्यात इंट्रेस्ट आहे, ते तुमची जाहिरात पाहतील. त्यानंतर तुमच्याशी संपर्क साधतील. त्यांच्याशी संपर्क झाल्यानंतर तुम्ही ही नोट विकू शकता.

आरबीआयचा अलर्ट काय?

जुनी नाणी आणि अशा प्रकारच्या नोटांच्या खरेदी आणि विक्रीबाबत आरबीआयने अॅलर्ट जारी केलेला आहे. संकेतस्थळावरील अशा प्रकारच्या दुर्मिळ नाण्यांची आणि नोटांची विक्री ही दोन पक्षांमधील तडजोड आहे. त्यात आरबीआयची कोणतीच भूमिका नाहीये. किंवा आरबीआयचा अशा प्रकाराशी काहीच संबंध नाहीये. आरबीआय अशा प्रकारपासून दूरच असते. त्यामुळे लोकांनीही व्यवहार करताना कोणत्याही अमिषाला बळी पडू नये, असं एक्सपर्टचं म्हणणं आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या ऑफर आल्या असतील तर तुमच्या रिस्कवरच व्यवहार करा. थोडी माहिती घेऊन आणि खात्री करूनच पाऊल उचला, असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया...
अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया....
फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत अलोट गर्दी
फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत अलोट गर्दी.
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल.
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर.
अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार?
अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार?.
मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल
मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल.
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!.
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया.
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती.
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर.