सलग चौथ्यांदा रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कपात

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (आरबीआय) नागरिकांना मोठी भेट देण्यात आली आहे. आरबीआयने रेपो दरात पुन्हा एकदा कपात केली आहे. त्यामुळे कर्जाच्या व्याजदरात कमी होऊन हप्ता कमी होण्याची चिन्हं आहेत.

सलग चौथ्यांदा रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कपात
ऑफिसर ग्रेड-बीच्या पहिल्या पेपरचा निकाल जाहीर
Follow us
| Updated on: Aug 07, 2019 | 1:22 PM

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (आरबीआय) नागरिकांना मोठी भेट देण्यात आली आहे. आरबीआयने रेपो दरात पुन्हा एकदा कपात केली आहे. त्यामुळे कर्जाच्या व्याजदरात कमी होऊन हप्ता कमी होण्याची चिन्हं आहेत. यंदा रेपो दर 35 टक्क्यांनी कमी केला आहे. त्यामुळे रेपो दर आता 5.40 झाला आहे. याआधी रेपो दर 5.75 होता. सलग चौथ्यांदा आरबीआयने रेपो दरात कपात केली आहे.

रेपो दरात कपात केल्यानंतर घर आणि वाहन कर्जावरील व्याज दर कमी होणार आहे. आरबीआयकडून रिव्हर्स रेपो दरातही घट करण्यात आली आहे. रिव्हर्स रेपो दरात आता 5.15 टक्के कपात केली आहे. पहिले 5.50 रिव्हर्स रेपो दर होता. याआधी 5 डिसेंबर 2018 रोजी रेपो दरात कपात केली होती. आतापर्यंत आरबीआयने 1.40 टक्के रेपो दरात घट झाली आहे.

रेपो दरात चौथ्यांदा कपात

आरबीआयने सलग चौथ्यांदा रेपो दरात 35 टक्क्यांनी कपात केली. रेपो दरात कपात केल्याने रिव्हर्स रेपो दरातही कपात होते. यापूर्वीच्या तीन बैठकांमध्ये आरबीआयने 1.40 टक्क्यांची कपात केली होती. रिझर्व्ह बँकेच्या इतिहासात सलग चौथ्यांदा रेपो दरात कपात होण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला होता, त्यांच्या जागी शक्तीकांत दास यांची गव्हर्नरपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर सलग चार वेळा रेपो दरात कपात झाली.

तुम्हाला फायदा काय?

रेपो दरात कपात केल्यामुळे त्याचा फायदा नागरिकांना होतो. आरबीआयने व्याजदर कपात केल्यामुळे बँकांवरही व्याजदर कपातीसाठी दबाव असेल. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज यांसारखेंचे हप्ते कमी होतील.

रेपो दर म्हणजे काय?

रेपो दर किंवा रेपो रेट म्हणजे बँका रिझर्व्ह बँकेकडून ज्या दराने पैसा घेते तो दर. रेपो दर वाढल्यास, बँकांना रिझर्व्ह बँकांना वाढीव व्याजदराने पैसे द्यावे लागतात. त्याचा परिणाम म्हणून बँक आपल्या कर्जदारांचं व्याजदर वाढवते. त्यामुळे रेपो दरात कपात झाल्यास, बँकाही आपल्या कर्जदारांचं व्याजदर कमी करतात. रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळतात. त्यामुळे बँका कर्जदारांना पैसे देताना कमी दरात देऊ शकतात.

रिव्हर्स रेपो

रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट. जशा बँका आरबीआयकडून कर्ज घेतात, तसं आरबीआयही बँकाकडून कर्ज घेतात, ठेवी ठेवल्या जातात. तो दर म्हणजे रिव्हर्स रेपो दर होय. रेपो दरामध्ये बदल झाल्यानंतर तोच दर रिव्हर्स रेपो दराला लागू होतो.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.