एसबीआयकडून 2 लाखांचा मोफत फायदा; ‘हे’ ग्राहक असणार लाभार्थी

देशातील सर्वत मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (SBI) आपल्या ग्राहकांना मोफत दोन लाख रुपयांच्या अपघाती विम्याचा लाभ देण्यात येत आहे. मात्र त्यासाठी संबंधित ग्राहकाचे प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत बँकेत खाते असायला हवे.

एसबीआयकडून 2 लाखांचा मोफत फायदा; 'हे' ग्राहक असणार लाभार्थी
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 11:14 AM

नवी दिल्ली – देशातील सर्वत मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (SBI) आपल्या ग्राहकांना मोफत दोन लाख रुपयांच्या अपघाती विम्याचा लाभ देण्यात येत आहे. मात्र त्यासाठी संबंधित ग्राहकाचे प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत बँकेत खाते असायला हवे. भारताबाहेर जर एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला, तर त्या व्यक्तीला देखील एसबीआयकडून अपघाती विम्याचे सुरक्षा कवच मिळणार असल्याचे बँकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

या विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्तीला एसबीआयमध्ये प्रधानमंत्री जनधन योजेनेंतर्गत खाते उघडावे लागणार आहे. ज्या व्यक्तींना एसबीआयचे रुपे जनधन डेबीटकार्ड मिळाले आहे, असे सर्वजन या योजनेसाठी पात्र असणार आहेत. ज्या व्यक्तींनी 28 ऑगस्ट 2018 पूर्वी बँकेत खाते उघडले आहे, त्यांना देखील या विम्याचा लाभ मिळणार आहे. ज्या व्यक्तीचे एसबीआयमध्ये जनधन खाते आहे त्या व्यक्तींन 2 लाखांचा तर ज्यांनी 28 ऑगस्ट 2018 पूर्वी बँकेत खाते उघडले आहे, त्यांना एक लाखांचा अपघाती विमा मिळणार आहे.

 क्लेम कसा करावा?

संबंधित व्यक्तीचा अपघातामध्ये मृत्यू झाल्यास विम्याचा लाभ घेण्यासाठी बेनिफिशरी म्हणून ज्या व्यक्तीचे नाव असेल, त्या व्यक्तीला एसबीआयचा एक क्लेम फॉर्म भरावा लागणार आहे. त्या फॉर्मसोबत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे मृत्यू  प्रमाणपत्र, अपघाती मृत्यू झाल्याची एफआयआरची कॉपी आणि मृत व्यक्तीचे आधारकार्ड जोडावे लागणार आहे. सर्व कागदपत्रे जमा केल्यानंतर बेनिफिशरी व्यक्तीला विम्याची रक्कम मिळेल. मात्र अपघाती मृत्यू झाल्यापासून 90 दिवसांच्या आत ही सर्व प्रक्रिया करणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या 

व्यवसायिकांचे क्रिप्टोकरन्सीला प्राधान्य; सोन्यातील गुंतवणुकीत घट, काय आहेत कारणे?

Paytm ने शेअर विक्रीत इतिहास रचला, 18300 कोटी रुपयांचा IPO पूर्ण सबस्क्राईब झाला

भारतात पेट्रोल कार इतक्‍याच स्वस्त होणार इलेक्ट्रिक कार, काय आहे नितीन गडकरींचा प्लान?

Non Stop LIVE Update
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.