AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautam Adani | काय सांगताय राव, डोळे होतील पांढरे, अदानींच्या संपत्तीत एकाच दिवशी इतक्या कोटींची वाढ

Gautam Adani Networth | हे वर्ष उद्योगपती गौतम अदानींसाठी सर्वोत्तम राहिलं. 2022 मध्ये त्यांची एकूण संपत्ती 66.2 दशलक्ष डॉलरने वाढली आहे. त्यांनी या आठवड्यात Louis Vuitton चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक बर्नार्ड अर्नाल्ट (Bernard Arnault) यांना मागे टाकले आहे. त्यामुळे भारतातीलच नाही तर आशियाचे पहिले व्यक्ती झाले आहेत.

Gautam Adani | काय सांगताय राव, डोळे होतील पांढरे, अदानींच्या संपत्तीत एकाच दिवशी इतक्या कोटींची वाढ
वाढता वाढता वाढे Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Aug 31, 2022 | 3:11 PM
Share

Gautam Adani Networth | या आठवड्यात भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांनी जागतिक स्तरावर नवा इतिहास रचला. जागतिक श्रीमंताच्या यादीत त्यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे. हे वर्ष उद्योगपती गौतम अदानींसाठी सर्वोत्तम राहिलं. 2022 मध्ये त्यांची एकूण संपत्ती 66.2 दशलक्ष डॉलरने वाढली आहे. बाजारात सुचीबद्ध त्यांच्या कंपन्यांच्या शेअर्सने कमाल दाखवली. त्यामुळे एकाच दिवशी अदानी यांच्या एकूण संपत्तीत 5.29 दशलक्ष डॉलरची (जवळपास 42 कोटी) वाढ झाली. त्याआधारे त्यांनी या आठवड्यात Louis Vuitton चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक बर्नार्ड अर्नाल्ट (Bernard Arnault) यांना मागे टाकले आहे. त्यामुळे भारतातीलच नाही तर आशियाचे पहिले व्यक्ती झाले आहेत. जगातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानी असलेले जेफ बेंजोस (Jeff Bezos) यांच्यात आणि अदानी यांच्यात आता फार मोठे अंतर उरले नाही. जर याच हिशोबाने अडानी यांची संपत्ती वाढली तर काही दिवसातच ते बेंजोस यांना मागे टाकतील हे नक्की.

एका दिवसात एवढे अंतर झाले कमी

ब्लूमबर्ग बिलिनियर्स निर्देशांकानुसार (Bloomberg Billionaires Index) अदानी यांच्या एकूण संपत्तीत 31 ऑक्टोबर रोजी बाजार बंद झाल्यानंतर संपत्तीत 5.29 दशलक्ष डॉलर वाढ झाली. त्यांची संपत्ती 143 दशलक्ष डॉलरवर पोहचली. दुसऱ्या स्थानी असलेले बेंजोस यांची एकूण संपत्ती 152 दशलक्ष डॉलर आहे. बेंजोस यांच्या एकूण संपत्तीत 1 दशलक्ष डॉलरची घसरण झाली आहे. या हिशोबानुसार, दोघांमधील अंतर आता केवळ 9 दशलक्ष डॉलरचे राहिले आहे. एक दिवसापूर्वीच दोघांच्या संपत्तीत 16 दशलक्ष डॉलरची तफावत होती. त्यांनी या आठवड्यात Louis Vuitton चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक बर्नार्ड अर्नाल्ट (Bernard Arnault) यांना मागे टाकले आहे. त्यामुळे भारतातीलच नाही तर आशियाचे पहिले व्यक्ती झाले आहेत.

मुकेश अंबानींची पुन्हा एंट्री

गेल्या 24 तासात रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) संचालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनाही फायदा झाला आहे. यादरम्यान अंबानी यांच्या संपत्तीत 2.04 अरब डॉलरचा फायदा झाला आहे. आता अंबानी यांची एकूण संपत्ती 94 दशलक्ष डॉलर इतकी झाली आहे. संपत्तीतील या दरवाढीमुळे मुकेश अंबानी यांनी ब्लूमबर्गच्या धनकुबेर यादीत स्थान पटकावले. ते टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत झळकले. धनकुबेरांच्या यादीत ते 9 व्या स्थानी आहेत. एक दिवसापूर्वी ते 11 व्या स्थानी होते. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 9190 कोटी डॉलर म्हणजे सुमारे 7.35 लाख कोटी इतकी आहे. या वर्षी त्यांची संपत्ती 196 कोटी डॉलर्स म्हणजेच सुमारे 1.57 लाख कोटींनी वाढली आहे.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.