AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautam Adani : श्रीमंतांच्या यादीतून गौतम अदानी बाहेर, इतक्या अब्जाचा बसला फटका

Gautam Adani : एका अहवालामुळे गौतम अदानी यांच्या साम्राज्याला मोठा धक्का बसला आहे.

Gautam Adani : श्रीमंतांच्या यादीतून गौतम अदानी बाहेर, इतक्या अब्जाचा बसला फटका
यादीतून बाहेर
| Updated on: Jan 31, 2023 | 5:32 PM
Share

नवी दिल्ली : अमेरिकेची संशोधन संस्था हिंडनबर्गच्या (Hindenburg Report) अहवालानंतर गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या साम्राज्याला मोठा हादरा बसला आहे. श्रीमंतांच्या यादीत चौथ्या स्थानी असलेल्या गौतम अदानी टॉप-10 मधूनच बाहेर फेकल्या गेले आहेत. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सच्या (Bloomberg Billionaires Index) टॉप-10 अब्जाधिशांच्या यादीतून त्यांचा पत्ता कट झाला. अदानी या यादीत चौथ्या क्रमांकावरुन थेट 11 व्या स्थानी फेकल्या गेले. गौतम अदानी यांची संपत्ती 36.1 अब्ज डॉलरवरुन कमी होऊन 84.21 अब्ज डॉलरवर आली आहे. आता गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्यात केवळ एका क्रमांकाचे अंतर उरले आहे.

ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर बर्नार्ड अर्नाल्ट आहेत. त्यांची एकूम संपत्ती 189 अब्ज डॉलर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर एलन मस्क आहेत. त्यांची एकूण संपत्ती 160 अब्ज डॉलर आहे. तिसऱ्या स्थानावर जेफ बेजोस हे आहेत. त्यांची एकूण संपत्ती 124 अब्ज डॉलर आहे.

या यादीत चौथ्या स्थानावर बिल गेटस यांचा क्रमांक लागतो. त्यांची एकूण संपत्ती 111 अब्ज डॉलर आहे. पाचव्या क्रमांकावर वॉरेन बफेट हे आहेत. त्यांची एकूण संपत्ती 107 अब्ज डॉलर आहे. सहाव्या क्रमांकावर लॅरी एलिसन यांचा क्रमांक आहे. त्यांच्याकडे एकूण 99.5 अब्ज डॉलर संपत्ती आहे. सातव्या क्रमांकावर लॅरी पेज हे आहेत. त्यांची एकूण संपत्ती 90 अब्ज डॉलर आहे.

आठव्या क्रमांकावर स्टीव बालमर आहेत. त्यांच्याकडे एकूण 86.9 संपत्ती आहे. नवव्या स्थानी सेरजी ब्रिन यांच्या क्रमांक आहे. त्यांच्याकडे एकूण 86.4 अब्ज संपत्ती आहे. दहाव्या स्थानावर कारलॉस स्लिम हे आहेत. त्यांच्याकडे एकूण 85.4 अब्ज संपत्ती आहे.

गेल्या आठवड्यात हिंडनबर्गने गौतम अदानी यांच्या कंपनीबाबत अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यानंतर बाजारात एकदम खळबळ माजली. अनियमितता आणि फसवणुकीच्या आरोपानंतर अदानी समूहासह शेअर बाजारात भयकंप आला. गेला शुक्रवार ब्लॅक फ्रायडे ठरला.

हिंडनबर्गने अदानी समूहाच्या कंपन्यांबाबत एकूण 413 पानांचा अहवाल तयार केला आहे. त्यात गुंतवणूकदारांना भ्रमित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा अहवाल खोटा आणि फसवणूक करणारा असल्याचा दावा अदानी समूहाने केला आहे.

एफपीओला नुकसान पोहचण्यासाठीचा हा अहवाला आणल्याचा आरोप समूहाने केला आहे. अदानी एंटरप्राईजसच्या एफपीओलाही या बातमीने हादरा दिला. शुक्रवारी पहिल्या दिवशी केवळ एक टक्के गुंतवणूकदारांनी त्यामध्ये बोली लावली.

बीएसईवर(BSE) अदानी एंटरप्राईजेसच्या एफपीओवर पहिल्या दिवशी 4.55 कोटी शेअरच्या बदल्यात केवळ 4.7 लाख शेअरसाठीच बोली लावण्यात आली.

निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.