RBL Bank Popcorn Credit Card : महिन्याला मिळवा 2 मूव्ही तिकीट आणि 25 रुपयांचा कॅशबॅक, वाचा फिचर्स

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Apr 12, 2021 | 7:43 AM

आरबीएल बँक पॉपकॉर्न क्रेडिट कार्ड धारकास वेलकम गिफ्ट म्हणून 4 बुकमीशो मूव्ही तिकिटे (अधिकतम 1000 रुपये) मिळतात.

RBL Bank Popcorn Credit Card : महिन्याला मिळवा 2 मूव्ही तिकीट आणि 25 रुपयांचा कॅशबॅक, वाचा फिचर्स

Follow us on

नवी दिल्ली : जर तुम्हाला ऑनलाइन मूव्ही तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म बुकमायशोद्वारे (BookMyShow) नियमितपणे मूव्हीची तिकिटे बुक करायची असल्यास आरबीएल बँक पॉपकॉर्न क्रेडिट कार्ड (RBL Bank Popcorn Credit Card) आपल्यासाठी उत्तम कार्ड ठरू शकते. या कार्डद्वारे आपण दरमहा 2 मूव्ही तिकिटे विनामूल्य मिळवू शकता. (get 2 free movie tickets and 25 rupees cashback know features of rbl popcorn credit card)

आरबीएल पॉपकॉर्न क्रेडिट कार्डची वैशिष्ट्ये

– आरबीएल बँक पॉपकॉर्न क्रेडिट कार्ड धारकास वेलकम गिफ्ट म्हणून 4 बुकमीशो मूव्ही तिकिटे (अधिकतम 1000 रुपये) मिळतात. पहिल्या देय तारखेपर्यंत सदस्यता शुल्क भरल्यानंतर आणि किमान एक व्यवहार केल्यावर ते उपलब्ध आहे.

– BookMyShow च्या माध्यमातून दरमहा दोन तिकिटे खरेदी केल्यावर तुम्हाला जास्तीत जास्त 500 रुपयांची सूट मिळू शकते. हा मासिक लाभ मिळविण्यासाठी तुम्हाला दरमहा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून किमान 5 हजार रुपये खर्च करावे लागतील. जर या मार्गाने पाहिले तर ग्राहक एका वर्षामध्ये 24 मोफत चित्रपट तिकिटांचा लाभ घेऊ शकतात.

– आरबीएल बँक पॉपकॉर्न क्रेडिट कार्डमुळे कोठेही 2500 रुपये खर्च केल्यास तुम्हाला दर आठवड्याला 25 रुपये निश्चित कॅशबॅक मिळू शकेल. यासाठी, दर मंगळवारी आपल्याला कार्डच्या मागील बाजूस क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल.

– आरबीएल बँक पॉपकॉर्न क्रेडिट कार्डची वार्षिक सदस्यता शुल्क 1000 रुपये आहे. (get 2 free movie tickets and 25 rupees cashback know features of rbl popcorn credit card)

संबंधित बातम्या – 

Petrol-Diesel Rate : विकेंड लॉकडाऊननंतर पेट्रोल-डिझेल स्वस्त की महागलं? वाचा तुमच्या शहरातले दर

LIC च्या खास योजनेत महिन्याला मिळतील 26 हजार, वाचा कशी करायची गुंतवणूक

Bank Holidays : आताच उरकून घ्या बँकेची कामं, पुढच्या 6 दिवसांसाठी बँका असणार बंद, वाचा यादी

(get 2 free movie tickets and 25 rupees cashback know features of rbl popcorn credit card)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI