AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PF चा लेखाजोखा आता WhatsApp वर, EPFO आणणार नवीन सेवा, पैसे काढणे होणार सोपे

EPFO आता आपल्या सदस्यांसाठी लवकरच WhatsApp वर पीएफशी संबंधीत अनेक सेवा सुरु करण्याची तयारी करत आहे.

PF चा लेखाजोखा आता WhatsApp वर, EPFO आणणार नवीन सेवा, पैसे काढणे होणार सोपे
EPFO
| Updated on: Sep 14, 2026 | 4:42 PM
Share

जर तुमचे पीएफ अकाऊंट असेल आणि बॅलन्स वा क्लेमचे स्टेट्स पाहण्यासाठी वारंवार EPFO ची वेबसाईट वा एप्स उघडावे लागते. मात्र, आता हे काम सोपे होणार आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटन म्हणजे EPFO आपल्या मेंबर्ससाठी WhatsApp द्वारे अनेक सर्व्हीसेस सुरु करण्याची तयारी केली आहे. या अंतर्गत सदस्य आता त्यांच्या मोबाईलवरुन पीएफ बॅलन्स, पासबुक, अलिकडचे देवाण-घेवाण आणि क्लेमची स्थिती या संबंधी माहिती मिळवू शकणार आहेत. सध्या या सेवेची चाचणी सुरु आहे. संपूर्ण देशात ही सुविधा कधी सुरु होणार याची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही.

EPFO त्यांच्या ऑनलाईन सेवेला सोपे करण्यासाठी अनेक बदल करत आहे. यात UPI द्वारे PF चे पैसे काढण्याची सुविधा, नोकरी बदल्यानंतर PF चे आपोआप स्ट्रान्सफर आणि छोटे क्लेमचा लवकर निपटारा करण्यासाठी ऑटो सेटलमेंटची मर्यादा वाढवणे यांचा समावेश आहे. EPFO चा हेतू सदस्याला कमी कागदोपत्री प्रक्रीयेत वेग आणणे आणि सहज सेवा देणे आहे.

कशी काम करणार EPFO ची WhatsApp सर्व्हीस?

नवीन WhatsApp सर्व्हीस सुरु झाल्यानंतर मेंबर्स EPFO च्या WhatsApp व्हेरिफाईड क्रमांकावर ‘Hello’ लिहून बातचीत सुरु करु शकता. यानंतर त्यांना वेगवेगळ्या सेवांचे पर्याय मिळू शकतो. यात PF बॅलन्स पाहणे, अलिकडच्या ट्राक्झंशनची माहिती घेणे, क्लेमचे स्टेट्स चेक करणे आणि EPF पासबुक पाहाता येणे यांचा समावेश आहे.

कंपनी EPFO मध्ये पैसे टाकत आहे की नाही असे तपासा

याशिवाय आधारशी जोडलेले ऑथेंटिकेशनमध्ये मदत आणि DBT शी संबंधित अपडेट देखील मिळण्याची आशा आहे. ही सर्व्हील क्षेत्रीय भाषात देखील उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे जास्त लोकांना याचा वापर करणे सोपे होणार आहे. मात्र, आता सेवा चाचणीच्या टप्प्यात आहे आणि ही सेवा देशभर सुरु होण्याची शक्यता आहे.

PF संबंधीत अनेक बदल होणार

EPFO केवळ WhatsApp सेवे पर्यंत मर्यादित नाही. संघटना PF शी संबंधित अनेक प्रोसेसला डिजिटल आणि वेगवान बनवण्यावर काम करत आहे. यात UPI द्वारे PF चे पैसे काढण्याच्या सुविधेचा देखील समावेश आहे. याशिवाय छोट्या आणि सोप्या दाव्यांना लवकरच मंजूर करण्यासाठी ऑटो-सेटलमेंटची मर्यादा वाढवण्यात आली आहे.

नोकरी बदलणाऱ्यासाठी देखील मोठी सुविधा मिळणार आहे. नव्या सेवेनुसार नोकरी बदलल्यानंतर पीएफ अकाऊंटला आपोआप ट्रान्सफर करण्याची प्रोसेस सोपी होणार आहे. या सोबतच एक सेंट्रलाईज्ड डेटाबेस तयार केला जात आहे. यामुळे वेगवेगळ्या रेकॉर्डला एका जागी जोडणे आणि सेवांमध्ये होणाऱ्या दीरंगाईला देखील कमी करण्यास मदत मिळू शकते.

नवीन नियमांमुळे पीएफ एडव्हान्स काढणे सोपे

नवीन EPFO ​​नियमांनुसार, विविध गरजांसाठी पीएफ एडव्हान्स काढण्यावर मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. आजारपणासाठी, सदस्य स्वतःच्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी आगाऊ रक्कम काढू शकतात आणि यासाठी कोणतीही निश्चित मर्यादा नाही.

शिक्षणासाठी, सदस्य स्वतःच्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या शिक्षणासाठी १० पटींपर्यंत आगाऊ रक्कम काढू शकतात. लग्नासाठी ५ पटींपर्यंत पीएफ आगाऊ रक्कम घेण्याची परवानगी आहे. घर खरेदी करणे, घर बांधणे, गृहकर्ज फेडणे किंवा घराचे नूतनीकरण करणे यांसारख्या उद्देशांसाठी देखील ५ पटींपर्यंत आगाऊ रक्कम घेता येते.

Follow Us
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बा
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बाप्पांचं स्वागत
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी..
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा, भारतीय भाषांच्या गौरव...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा आणि भारतीय भाषांच्या गौरवाचा संदेश
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजभाषा...
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; वाशीत राजभाषा संमेलनाचा थाट!
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती