Gold Silver Price Today : आज सोन्याने घोडे दामटले, किंमतीत झाली इतकी वाढ

Gold Silver Price Today : गेल्या आठवड्यापासून सोने-चांदीत नरमाई आहे. आज सोन्याने घोडे किंचित दमाटवले. चांदीने मात्र सकाळच्या सत्रात अजून पत्ते उघडे केलेले नाही. थोड्या वेळाने चांदीचे भाव दिसतील.

Gold Silver Price Today : आज सोन्याने घोडे दामटले, किंमतीत झाली इतकी वाढ
सोने-चांदीचा भाव काय
Follow us
| Updated on: Apr 26, 2023 | 9:22 AM

नवी दिल्ली : दिवाळीनंतर सोने-चांदी (Gold Silver Price Today) उर फुटूस्तोवर धावले. मध्ये थोडी धाप लागली या दोन्ही धातूंनी विश्रांती पण घेतली. पण त्यांचा धावण्याचा जोर का कमी झाला नाही. दिवाळीनंतर सोन्याने अंदाजे 11000 रुपये दरवाढीला गवसणी घातली. तर चांदीने सोन्यावणी परतावा दिला. गेल्या आठवडाभरपासून हे दोन्ही धातू दम खात आहेत. गेल्या 14 एप्रिल रोजी सोने-चांदीत चमक दिसली. त्यानंतर भाव घसरले आणि त्यात मोठा उलटफेर झाला नाही. गेल्या सहा महिन्यात सोन्यात जवळपास 11 हजारांची वाढ झाली तर चांदीच्या किंमतीही झरझर वधारल्या. 2 फेब्रुवारी 2023 आणि 5 एप्रिल 2023 रोजी सोने-चांदीने किंमतींच्या भाऊगर्दीत नवीन रेकॉर्ड (New Record) गाठला. दोन्ही दिवशी या दोन्ही धातूंनी भविष्यातील आगेकूच अधोरेखित केली.

हजार रुपयांची घसरण गेल्या आठवड्यात 14 एप्रिल रोजी 22 कॅरेट सोने 56,800 रुपये प्रति तोळा विक्री झाले. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,000 रुपयांना अगदी 50 रुपये कमी होता. मध्यंतरीच्या दहा दिवसांत दोन्ही धातूंच्या किंमतीत मोठी वाढ झाली नाही. अधून मधून सोन्याचे भाव वधरतात. पण त्यात मोठा बदल होत नाही. आज, 26 एप्रिल रोजी सोने किंचित वधारले.आज 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव अनुक्रमे 56,010 रुपये तर 61,090 रुपये प्रति तोळा होता. एका आठवड्यात भावात एक हजारांची घसरण झाली.

आज काय भाव गुडरिटर्न्सनुसार, 26 एप्रिल रोजी, सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्यात प्रति तोळा 10 रुपयांची दरवाढ झाली. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,010 रुपये तर 24 कॅरेटचा भाव 10 रुपयांनी वधारुन 61,090 रुपये प्रति तोळ्यावर आला.  तर एक किलो चांदीचा भाव 76,700 रुपये होता.

हे सुद्धा वाचा

भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

मेकिंग चार्ज कसा निश्चित होतो ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते. दागिने तयार करताना त्यावर किती सुबकपणे डिझाईन तयार करण्यात आली आहे. किती खुबीने दागिने तयार करण्यात आले आहे. त्यावर हे शुल्क आाकारण्यात येते. जितके आकर्षक, चित्तवेधक आणि बाराकाईने डिझाईन तयार करण्यात येते. तेवढाच त्यावरील मेकिंग चार्ज जास्त असतो. साधारण डिझाईन असेल तर कमी शुल्क आकारण्यात येते.

Non Stop LIVE Update
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.