AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Price Today News | सोन्या-चांदीत वाढ झाली की दर घसरले? काय आहेत आजचे दर?

Gold rate today: सोन्याच्या किंमतीत आज फारशी घसरण झाली नाही. तर चांदीच्या किंमती थोड्या उतरल्या आहेत.

Gold Silver Price Today News | सोन्या-चांदीत वाढ झाली की दर घसरले? काय आहेत आजचे दर?
आजचे सोने चांदीचे दरImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jul 28, 2022 | 12:59 PM
Share

Gold Silver Price Today News | अमेरिकन मध्यवर्ती बँक युएस फेडरल रिझर्व्ह बँकेने (US Federal Reserve Bank) पुन्हा व्याजदर (Interest Rate) वाढवल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) चिंतेचे वातावरण आहे. महागाई (Inflation) आटोक्यात आणण्यासाठीचे अमेरिकन बँकेचे प्रयोग सुरुच आहे. त्याचा परिणाम आता रुपया आणि सोन्यावर ही दिसून येईल. बँकेने काल केलेल्या या दरवाढीचे परिणाम सर्वत्र दिसून येतील. पण त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारात दिसून आला नाही. कालच्या तुलनेत सोन्याचे भाव (Gold Price Today) आज स्थिर होते. त्यात कोणताही बदल दिसून आला नाही. चांदीच्या दरात (Silver Rate Today) मात्र किंचित घट झाली आहे. कालनुसारच आजही 22 कॅरेट सोन्याची किंमती 46,450 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर गुड रिटर्न्स या संकेतस्थळानुसार, चांदीच्या दरात 20 पैशांची कमी आली आहे. चांदीची आज 54,000 रुपये प्रति किलो दराने विक्री केली जात आहे. भारतीय बाजारात मात्र सोन्यात ज्याप्रमाणात घसरण व्हायला हवी तेवढी दिसून येत नाही. बाजार भाव कमी जास्त होत आहेत. गेल्या पंधरवाड्यात सोन्याच्या दरात घसरण आणि तेजी दिसून आली होती.

राज्यातील चार शहरातील भाव

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,450 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,680 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,460 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,690 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,690 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 50,690 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 46,460 आहे तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 50,690 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 546 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

24, 22, 21, 18 आणि 14 कॅरेटमध्ये काय असतो फरक

24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं. इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात. त्याचबरोबर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं.

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले असते.

22 कॅरेट शुद्ध सोन्यावर 916 लिहिलेले असते.

21 कॅरेट शुद्ध सोन्यावर 875 लिहिलेले असते.

18 कॅरेट शुद्ध सोन्यावर 750 लिहिलेले असते.

14 कॅरेट शुद्ध सोन्यावर 585 लिहिलेले असते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...