AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate: सोनं-चांदीच्या दरांमध्ये मोठी उलथापालथ, किमती वाढल्या की कमी झाल्या? पाहा दर

आठवड्याच्या सुरुवातीला आता सोन्याचा आणि चांदीच्या किमतीने जोर पकडलेला दिसत आहे. किमती या वाढत असल्याने लोकांचे टेन्शनही वाढले आहेत. नेमके किती आहेत आजचे दर ते जाणून घ्या...

Gold Silver Rate: सोनं-चांदीच्या दरांमध्ये मोठी उलथापालथ, किमती वाढल्या की कमी झाल्या? पाहा दर
gold silver rate
| Updated on: Jul 21, 2026 | 11:01 AM
Share

21 जुलै 2026 रोजी देशांतर्गत सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमती मजबूत झाल्या. सर्वसामान्यांना काही दिलासा मिळालेला नाही. आता सणसुदीचे दिवस सुरु होणार आहेत आता या दिवसांत लोक सोनं आणि चांदी खरेदी करतात, सणासुदीला दागिने खरेदी करणं हे शुभ मानले जाते, यादृष्टीने आता सोन्याच्या आणि चांदीच्या किमती वाढताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार, डॉलरची हालचाल आणि गुंतवणूकदारांची वाढलेली खरेदी यांचा परिणाम भारतीय बाजारात स्पष्टपणे दिसून आला. प्रमुख शहरांमध्ये 22-कॅरेट आणि 24- कॅरेट सोन्याच्या किमती वाढल्या, तर चांदीचा व्यापारही उच्च पातळीवर झाला. आंतरराष्ट्रीय बाजार कॉमेक्समध्ये सोने आणि चांदी या दोन्हींच्या किमती वाढल्या आहेत. आकडेवारीनुसार, सोन्याचा भाव सुमारे 0.70 % ने वाढून प्रति औंस $ 4044.10 वर पोहोचला आहे. चांदीच्या किमतीही वाढल्या आहेत. चांदीचा भाव 1.51 % ने वाढून प्रति औंस $57.935 वर व्यवहार करत आहे.

एमसीएक्सवरील भाव किती? भारताच्या देशांतर्गत एमसीएक्समध्येही सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. सकाळी 9 वाजता, एमसीएक्सवर सोन्याचा भाव  0.70 % ने वाढून प्रति 10 ग्रॅम सुमारे ₹ 1,42,250 वर व्यवहार करत होता. अलीकडील चढ-उतारानंतर, किमती आता वाढीचा कल दर्शवत आहेत. दरम्यान, भारतात चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मागील दिवसांच्या तुलनेत सुमारे 1.11% वाढ होऊन चांदीचा भाव प्रति किलोग्राम ₹ 2,20,830च्या आसपास पोहोचला आहे.

शहरांमधील दर किती?  आज, मंगळवार, 21 जुलै 2026 रोजी, देशातील प्रमुख शहरांमध्ये 24-कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम ₹1.42 ते ₹ 1.43 लाखांच्या आसपास आहे, तर  22-कॅरेट सोन्याचा भाव सुमारे ₹ 1.31 लाख आहे. 18-कॅरेट सोन्याचा भावही सुमारे ₹1.07 लाख आहे. चांदीचा भाव प्रति किलोग्राम सुमारे ₹2.21 लाख होता.

कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतारामुळे सोने आणि चांदीच्या किमतीतही लक्षणीय चढ-उतार होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण झाल्यानंतर, कालपासून वाढ सुरू झाली आहे. जर तुम्ही लग्नासाठी, विशेष प्रसंगासाठी किंवा दीर्घ मुदतीसाठी सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बाजारावर लक्ष ठेवा. खरेदी करण्यापूर्वी बीआयएस (BIS) हॉलमार्क नक्की तपासा.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...