Gold Rate : सोन्याचा भाव भलताच वाढला, एका दिवसात थेट…10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार…
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. आजदेखील सोने चांगलेच चकाकले आहे. भविष्यात या मौल्यवान धातूची वाटचाल नेमकी कशी असणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Gold Aad Silver Rate : गेल्या काही दिवासांपासून सोने आणि चांदीच्या भावामध्ये मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. दिवाळीपूर्वी सोन्याचा भाव चांगलाच वाढला होता. आता तो काहीसा कमी झाला आहे. परंतु हळूहळू सोन्याचा भाव पुन्हा एखदा वाढताना दिसतोय. त्यामुळेच भविष्यात सोने आणि चांदी हे दोन्ही मौल्यवान धातू नेमकी काय कमाल करणार? असे उत्सुकतेने विचारले जात आहे. असे असतानाच आता पुन्हा एकदा सोन्याला पुन्हा चकाकी मिळाली आहे. सोन्याचा भाव पुन्हा एकदा चांगलाच वाढलेला पाहायला मिळाला आहे.
सोन्याचा भाव चांगलाच वाढला
मंगळवारी म्हणजेच 25 नोव्हेंबर रोजी सोन्याचा भाव एक टक्क्याने वाढला होता. त्यानंतर आता बुधवारीदेखील सोन्याचा भाव चांगलाच वधारलेला पाहायला मिळतोय. अमेरिकेची मध्यवर्थी बँक फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपात केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सध्या सोन्याचा भाव वाढताना दिसतोय. आज सकाळी मल्टी कमोडिटी एक्स्जेंच म्हणजेच एमसीएक्सवर डिसेंबरमध्ये एक्स्पायर होणाऱ्या सोन्याचा भाव 0.5 टक्क्यांनी वाढून तो 1,25,835 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. डिसेंबरमध्ये कॉन्ट्रॅक्ट एक्स्पायरी होणऱ्या चांदीचा भाव 0.91 टक्क्यांच्या तेजीसह 1,57,750 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे.
देशाच्या प्रमुख शहरांत सोन्याचा भाव काय?
भारतासह आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचा भाव वाढताना दिसत आहे. त्याचादेखील भारतीय बाजारावर परिणाम पडताना दिसतोय. आज चेन्नईमध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,28,730 रुपये झाला आहे. चेन्नईत 22 सोन्याचा भाव 1,18,000 रुपये प्रति 10 ग्रॅम वर पोहोचला आहे. मुंबीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,27,910 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,17,250 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,28,060 रुपये प्रति 10 ग्रॅम पेक्षा जास्त झाला आहे. यासह कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, केरळ, पुणे या शहरांत 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,27,910 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,17,250 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे.
भविष्यात सोन्याचा भाव कसा असणार?
सध्या सोन्याच्या भावात चढउतार होताना पाहायला मिळतेय. त्यामुळे भविष्यात सोन्याची वाटचाल कोणत्या दिशेने असणार असे विचारले जात आहे. काही तज्ज्ञांच्या मते सोने भविष्यात चांगलेच चकाकू शकते.
