AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold/Silver Rate Today: लसीकरणामुळे सोन्या-चांदीच्या किंमती घसरल्या, वाचा आजचे दर

नवी दिल्ली : कोरोनाच्या जीवघेण्या (Corona Vaccination) संसर्गानंतर आता लसीकरणाला देशभरात सुरुवात झाली आहे. 16 जानेवारीपासून संपूर्ण देशात लसीकरण कार्यक्रम सुरू होणार आहे. पण याच पार्श्वभूमिवर सोन्या-चांदीच्या दरात घट (Gold Silver price fall) झाल्याचं पाहायला मिळालं आहे. कमोडिटी मार्केटच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना लसीमुळे 2021 मध्ये सोन्याचा भाव 60,000 ची पातळी पार करेल. पण सध्या […]

Gold/Silver Rate Today: लसीकरणामुळे सोन्या-चांदीच्या किंमती घसरल्या, वाचा आजचे दर
gold silver price
| Edited By: | Updated on: Jan 15, 2021 | 5:58 PM
Share

नवी दिल्ली : कोरोनाच्या जीवघेण्या (Corona Vaccination) संसर्गानंतर आता लसीकरणाला देशभरात सुरुवात झाली आहे. 16 जानेवारीपासून संपूर्ण देशात लसीकरण कार्यक्रम सुरू होणार आहे. पण याच पार्श्वभूमिवर सोन्या-चांदीच्या दरात घट (Gold Silver price fall) झाल्याचं पाहायला मिळालं आहे. कमोडिटी मार्केटच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना लसीमुळे 2021 मध्ये सोन्याचा भाव 60,000 ची पातळी पार करेल. पण सध्या मात्र, सोन्याचा भाव 49 हजारांच्या पातळीवर आहे. ऑगस्ट 2020च्या तुलनेत उच्चांपेक्षा सुमारे 7000 रूपये कमी आहे. मागच्या वर्षी सोन्याने 30 टक्क्यांहून अधिक उत्पन्न दिलं होतं. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना खूश करता येईल की नाही याची प्रतीक्षा करावी लागेल. (gold and silver todays rate 15 january in pune mumbai patna jaipur surat and ahmedabad)

MCX वर सकाळच्या दरम्यान, 5 फेब्रुवारीच्या सोन्याला 49145 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. तो आता 76 रुपयांनी घसरला आहे. आज सकाळी भाव 133 रुपयांनी घसरून 49088 च्या पातळीवर मार्केट उघडलं. गुरुवारी सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 49221 रुपयांवर बंद झाला होता.

Gold-Silver price 15 January : पुणे, पटना, जयपुर, लखनऊ

गुड रिटर्नने दिलेल्या माहितीनुसार, आज 22 कॅरेट सोन्याची किंमत हैदराबादमध्ये 46000 रुपये, पुण्यात 48420 रुपये, अहमदाबादमध्ये 48590 रुपये, जयपूरमध्ये 48350 रुपये, लखनौमध्ये 48350 रुपये, पाटण्यात 48420 रुपये आणि सूरतमध्ये 48590 रुपये आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचा दर (Gold international market rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती किंचित वधारल्याचं पाहायला मिळतं. इन्व्हेस्टिंग डॉट कॉम वेबसाइटवर दिलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी महिन्यातील सोन्याचे दर प्रति औंस 1.15 वाढीसह (0.06%) 1852.55 डॉलरवर होते. 1 औंसमध्ये 28.34 ग्रॅम आहेत. तर यावेळी मार्चच्या चांदीमध्ये घट झाली आहे. चांदी 0.16 डॉलरच्या घसरणीसह (0.62%) प्रति औंस 25.64 डॉलरवर पोहोचली आहे. (gold and silver todays rate 15 january in pune mumbai patna jaipur surat and ahmedabad)

संबंधित बातम्या – 

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्ता पुन्हा सुरु, किती टक्के वाढ?

सगळ्यात मोठ्या सरकारी बँकेकडून अलर्ट, हा फोन आला तर उचलू नका नाहीतर खातं होईल रिकामं

(gold and silver todays rate 15 january in pune mumbai patna jaipur surat and ahmedabad)

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष