सोन्याने तोडले सारे रेकॉर्ड, एक तोळा सोन्याची किंमत पोहचली लाखाच्या पार

सोन्याचे दर सर्वसामान्यांचा आवाक्याबाहेर कधीच पोहचले आहेत. लग्नसराईमुळे ज्यांना दागिन्यांची खरेदी करायची होती त्यांचे स्वप्न दरवाढीने आधीच धुळीस मिळाले असताना आता सोन्याचे दर एक लाखाच्याही पुढे गेले आहेत.

सोन्याने तोडले सारे रेकॉर्ड, एक तोळा सोन्याची किंमत पोहचली लाखाच्या पार
Gold breaks all records, price of one tola gold crosses one lakh rupees
Updated on: Apr 21, 2025 | 9:04 PM

एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असताना आता सोन्याच्या भावाने अखेर लाखाची वेस ओलांडली आहे. कमजोर झालेला डॉलर आणि अमेरिका – चीन व्यापार युद्ध यावरुन अनिश्चितचेचे वातावरणाच्या पार्श्वभूमीवर आता चलन वाढ झाल्याने देशाची राजधानी दिल्लीत सोमवारी सोन्याच्या भावाने एक लाख रुपयांच्या आकड्याला पार केले आहे. सोन्याचे भाव दहा ग्रॅमला 1,650 रुपयांनी वाढ झाली होती. परंतू सायंकाळ होताच सोन्याचे भाव एक तोळ्यासाठी एक लाखाहून पुढे गेले…

अखिल भारतीय सराफ संघाने दिलेल्या माहीतीनुसार सोन्याच्या किंमती मोठी वाढ झाली आहे. देशाची राजधानी दिल्लीत  एका तोळ्याचे सोन्याचे भाव एक लाखाच्याही पार गेले आहेत. राजधानी दिल्लीत सोन्याचे भाव अखेर एका तोळ्याला एका लाखाच्या पुढे गेले आहेत. दिल्ली सराफा बाजारात 21 एप्रिल 2025 सायंकाळी 6.28 वाजेपर्यंत 10 ग्रॅम सोन्याचा भाव अखेर 1 लाख 250 रुपयांच्या पुढे पोहचला आहे.

काल होती घट आज अचानक उसळी

99.9 टक्के सोन्याचे दर सोमवारी आधी 99,800 रुपये प्रती 10 ग्रॅम ( एक तोळा ) पोहचले होते. शुक्रवारी यात थोडी घसरण होऊन 20 रुपयांनी दर घसरुन 98,150 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत पोहचले होते. परंतू आज सायंकाळी तर अचानक सोन्याच्या दरात उसळी आली आणि सोन्याचे दर एक लाखाच्याही पार गेल्याचे अखिल भारतीय सराफ संघाने म्हटले आहे.

सोन्याच्या दराचा उच्चांक

आज सोमवारी स्थानिक बाजारात 99.5 शुद्ध सोन्याचा दर 1,600 रुपयांनी उसळून 99,300 रुपये प्रति 10 ग्रॅम ( एक तोळा ) या नव्या उच्चांकावर पोहचला आहे. गेल्या कामकाज सत्रात यात किरकोळ घसरण होऊन भाव 97,700 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. परंतू सायंकाळी अचानक बाजारात उसळी येऊन सायंकाळी 6 . 28 वाजता एक लाखाच्या पार गेला आहे.