AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यूएईच्या CARACAL आणि भारताच्या ICOMM ची हैदराबादमध्ये अत्याधुनिक लघुशस्रास्रांची निर्मिती

हैदराबाद येथे युएईच्या मदतीने शस्रास्र निर्मितीचा लघू कारखाना तयार होऊन शस्रनिर्मिती होणार आहे. त्यामुळे 'मेक इन इंडिया' अंतर्गत निर्मिती केलेली शस्रे जागतिक पातळीवर निर्यात केली जाणार आहेत.

यूएईच्या CARACAL आणि भारताच्या ICOMM ची हैदराबादमध्ये अत्याधुनिक लघुशस्रास्रांची निर्मिती
UAE's CARACAL and India's ICOMM to manufacture advanced weapons in Hyderabad
| Updated on: Apr 21, 2025 | 4:22 PM
Share

भारताच्या संरक्षण क्षेत्राने ‘मेक इन इंडिया’ मोहीमेंतर्गत शस्रास्र निर्मितीत एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. यूएईतील CARACAL ( EDGE ग्रुपची घटक कंपनी) आणि भारतीय ICOMM ( MEIL  ग्रुपची सहाय्यक कंपनी ) यांनी हैदराबाद येथे अत्याधुनिक लघु शस्रास्र उत्पादन कारखाना सुरू केला आहे. यूएईमधून तंत्रज्ञान हस्तांतरणाने भारतात सुरु होणारा हा पहिलाच संरक्षण शस्रास्रांचा प्रकल्प आहे.

प्रकल्पाची मुख्य वैशिष्ट्ये:

CARACAL च्या या अत्याधुनिक शस्रास्र निर्मिती केंद्रात शस्रास्रांचे उत्पादन होणार आहे, यात रायफल्स, स्नायपर रायफल्स, सबमशीन गन्स आणि कॉम्बॅट पिस्तुल यांचा समावेश आहे.या अत्याधुनिक शस्रास्रांचा समावेश आहे.

प्रमुख शस्त्रे: 

• CAR 816 क्लोज-क्वार्टर बॅटल रायफल

• CSR 338 स्नायपर रायफल

• CMP9 सबमशीन गन

या शस्रांची गरज आणि उपयोग :  या शस्रास्रांचा उपयोग भारतीय सैन्य, अर्धसैनिक दल, विशेष दल, राज्य पोलिस दल, तसेच जागतिक निर्यातीच्या गरजा पुरवण्यासाठी केला जाणार आहे

ICOMM आणि CARACAL यांची भूमीका:

हे केंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत दृष्टीकोनाचे प्रतीक आहे. आयातीवरील अवलंबित्व कमी करून, हे उत्पादन केंद्र भारताला आत्मनिर्भरतेच्या मार्गावर आणखी पुढे नेईल असे ICOMM चे व्यवस्थापकीय संचालक सुमंत पटुरू यांनी म्हटले आहे.  “युएई बरोबरील ही भागीदारी भारताच्या संरक्षण उद्योगाच्या वाढीस गती देण्यात महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे..” असे CARACALचे CEO हमाद अलमेरी यांनी म्हटले आहे.

उद्योगाचे महत्त्व:

• भारतीय कौशल्य आणि युनाएटेड अरब अमिरातीचे तंत्रज्ञान यांचे एकत्रीकरण : भारताच्या जागतिक दर्जाच्या संरक्षण उत्पादन क्षमतेला चालना

• आत्मनिर्भर भारतासाठी अत्यावश्यक पाउल : स्थानिक उत्पादनाची वाढ आणि संरक्षण क्षेत्रात स्वावलंबन.

• निर्यात क्षमता : भारत आता जागतिक पातळीवर उच्च दर्जाची शस्त्रे पुरवठा करू शकणार आहे.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.