AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Outlook : कोणत्या 5 गोष्टींचा सोन्याच्या किंमतीवर दिसणार परिणाम? सोनं चकाकणार की किंमती भडकणार?

Gold Rate Today : मजबूत डॉलरपुढे सोन्याने ही लोटांगण घेतले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती गेल्या 10 महिन्यांच्या निच्चांकी स्तरावर पोहचल्या आहेत.जून महिन्यात महागाईचा आकडा प्राप्त झाल्यानंतर अमेरिकन केंद्रीय बँक त्यांचे पुढील धोरण ठरवेल.

Gold Outlook : कोणत्या 5 गोष्टींचा सोन्याच्या किंमतीवर दिसणार परिणाम? सोनं चकाकणार की किंमती भडकणार?
काय आहेत आज सोन्याचे दरImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jul 11, 2022 | 10:38 AM
Share

Gold Rate News : मजबूत झालेल्या डॉलरपुढे (Dollar) रुपयाने अगोदरच लोटांगण घेतले आहे. आता सोन्यानेही (Gold) डॉलरसमोर सपशेल शरणागती पत्करली आहे. सोन्याच्या किंमतींवर (Gold Price) डॉलरचा दबाव वाढला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड 10 महिन्यांच्या निच्चांकी स्तरावर पोहचले आहे. महागाईमुळे अमेरिकन फेडरल रिझर्व्ह (Federal Reserve) पुन्हा कडक धोरण अवलंबेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे डॉलर आणखी मजबूत होईल. डॉलर इंडेक्स (Dollar Index) 20 वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहचला आहे. याचा थेट परिणाम सोन्याच्या किंमतीवर दिसून येत आहे. घरगुती बाजारात एमसीएक्सवर(MCX) सोन्याच्या किंमतीत 1100 रुपयांची पडढड झाली आहे. येत्या काही दिवसात अमेरिकेतील महागाईचा आकडा, डॉलर इंडेक्स, फेडरल रिझर्व एक्शन आणि आर्थिक मंदी बाबतची माहिती याचा संपूर्ण परिणाम सोन्याच्या किंमतीवर दिसून येईल. भारतात या आठवड्यात सोन्याच्या किंमती दोन हजारांच्या दरम्यान खेळत होत्या. रशियाच्या सोने निर्यातीवर (Russian Gold Export) बंदी आणण्याच्या प्रस्तावानंतर सोन्याच्या किंमती भडकण्याची चिन्हे होती. परंतू ,सध्या सोन्याच्या किंमती बाजारात घसरल्या आहेत.

  1. या पाच घटकांचा थेट परिणाम
  1. जर डॉलर आणखी मजबूत झाला तर सोन्याच्या किंमती पुन्हा घसरतील. डॉलर इंडेक्स आतापर्यंत त्याचा रेकॉर्ड मोडून गेल्या 20 वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहचला आहे. डॉलर इंडेक्सने पुन्हा उसळी घेतल्यास सोने लोटांगण घेईल आणि किंमतीत घट होईल. भारत जगातील दुसरा सोनं आयात करणारा देश आहे. या सोन्यावर आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा थेट परिणाम होतो.
  2. सोन्यावर परिणाम करणारा आणखी एक घटक म्हणजे कच्चे तेल(Crude Oil), अमेरिका आणि पश्चिमात्य देश रशियाचे तेल 40-60 डॉलर प्रति बॅरलच्या दरम्यान ठेऊ इच्छितात.
  3. पुढील आठवड्यात अमेरिकेच्या जून महिन्यातील महागाईचा आकडा समोर येईल. त्यावर सर्व गोष्टी स्पष्ट होतील. IIFL सिक्योरिटीज चे अनुज गुप्ता यांच्या माहितीनुसार, जर अमेरिकेचा महागाईचा डेटा निराशाजनक असेल तर डॉलर फायद्यात राहिल आणि परिणामी सोन्याच्या किंमती वाढतील.
  4. फेडरल रिझर्व्ह बँकेने गेल्या बैठकीत व्याजदरात 75 बेसिस पॉईंट्सने वाढ केली होती. तरीही महगाईवर जास्त परिणाम दिसून आला नाही. अशात महागाईचा चढता आलेख बघता फेडरल रिझर्व्ह नरम धोरण स्वीकारु शकते. कारण व्याजदर वाढीचा वृद्धीवर परिणाम दिसून येईल. अमेरिकन अर्थव्यवस्थेत मंदीची चाहूल लागल्याची चर्चा आहे. त्यामुळे केंद्रीय बँकेला विचारपूर्वक धोरण ठरवावे लागणार आहे.
  5. डॉलरच्या तुलने रुपयाची ऐतिहासीक निच्चांकी घसरण झाली आहे. सोन्याच्या दमछाकीचा परिणामही सोन्याच्या किंमतींवर दिसून येईल.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.