AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate Forecast : वाढता वाढता वाढे.. सोनेप्रेमींसाठी धक्कादायक बातमी ! अडीच लाखांपर्यत वाढणार किंमत?

Gold Rate Forecast : एकेकाळी 1 तोळा म्हणजेच 10 ग्रॅम सोन्याची किंमत फक्त 30,000 रुपये होती. पण जुलै 2025 पर्यंत त्याची किंमत जवळजवळ 1 लाख रुपयांपर्यंत वाढली. गेल्या सहा वर्षांत 200 % वाढ झाल्याचे दिसून आलं. त्यानुसार, येत्या काळात सोन्याची किंमत 2.5 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकेल का?

Gold Rate Forecast : वाढता वाढता वाढे.. सोनेप्रेमींसाठी धक्कादायक बातमी ! अडीच लाखांपर्यत वाढणार किंमत?
जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासातले सोन्याने चांदीचे आजचे दर हे सर्वाधिक असल्याचं सराफ व्यावसायिक यांनी म्हटलं आहेImage Credit source: PTI
| Updated on: Aug 13, 2025 | 9:07 AM
Share

Gold Rate Forecast : सोना कितना सोना है… बहुतांश लोकांना सोन्याचे दागिने घालायची आवड असते. भारतात जवळपास प्रत्येक सोन्याचे दागिने असताततच. पण गेल्या काही काळात सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. काही काळापूर्वी सोन्याची किंमत 50 हजार रुपयांपेक्षा कमी होती. मात्र आज त्यच्या सोन्याचा भाव हा 1 लाखांवर पोहोचला आहे. आज दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या 1 तोळा अर्थात 10 ग्रॅमची किंमत 1,02,640 रुपये इतकी आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमतही जवळपास आहे.

देशातील सर्व शहरांमध्ये हा दर कमी-अधिक प्रमाणात सारखाच आहे. एकेकाळी सोन्याची किंमत सुमारे 30 हजार रुपये होती. पण जुलै 2025 पर्यंत त्याच्या किमती 1 लाख रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. गेल्या 6 वर्षातील किमतींची तुलना केल्यास 200% ची वाढ दिसून येते. मग भविष्यात सोन्याच्या किमती किती वाढू शकतात?

का वाढतोय सोन्याचा भाव ?

सोन्याच्या वाढत्या किमती पाहून प्रत्येकाच्या मनात असा प्रश्न येणं स्वाभाविक आहे की सोन्याचे दर इतके कावाढत आहेत?. खरं तर, तज्ञांचे म्हणण्यानुसार, जागतिक तणाव हे सोन्याच्या किमती वाढण्यामागे एक प्रमुख कारण आहे. एकीकडे रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे, तर दुसरीकडे इराण आणि इस्रायलमध्ये संघर्ष सुरू आहे. याशिवाय कोविड-19 महामारी आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे सोन्याच्या किमतीही वाढत आहेत.

गुंतवणूकदारांसाठी सोनं (Gold) हा नेहमीच एक सुरक्षित मार्ग राहिला आहे. एप्रिल 2025 मध्ये, आपण पाहिलं की एमसीएक्समध्ये 10 ग्रॅम सोन्याचे मूल्य 1, 01,078 रुपयांपर्यत पोहोचलं. लाईव्ह मिंटच्या मते, सोन्याची ही हालचाल पाहून, तज्ञांचा अंदाज आहे की पुढील 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याची किंमत 2,25,000 रुपयांपर्यंत म्हणजेच तब्बल 2 लाखांपर्यंत पोहोचू शकते. साल 2019 ते 2025 दरम्यान, सोन्याच्या किमती दरवर्षी 18 % दराने वाढल्या आहेत. जर हे असंच चालू राहिलं तर किंमत 2.5 लाख रुपयांपर्यंत पोहोचेल.

मात्र, दुसऱ्या एका अहवालात असं म्हटलं आहे ती सोन्याचा बाजार एकत्रीकरणाच्या टप्प्यात प्रवेश करत आहे. जर एखादी मोठी घटना किंवा आंतरराष्ट्रीय तणाव नसेल तर किंमती स्थिर राहू शकतात. चीनने आपल्या विमा क्षेत्रातील एकूण मालमत्तेपैकी (AUM) 1% सोन्यात गुंतवले आहे. तसेच मध्यवर्ती बँका सोन्याची खरेदी कमी करत आहेत. सोन्याच्या किमतींचे भविष्य अद्याप अस्पष्ट आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.)

Follow Us
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...