Gold Price Today: जन्माष्टमीच्या दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी घट, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचा भाव

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 30, 2021 | 11:01 AM

मजबूत रुपया आणि सकारात्मक जागतिक संकेतांमुळे आज भारतात सोने आणि चांदीच्या किमती कमी झाल्यात. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) ऑक्टोबर फ्युचर्समध्ये सोन्याच्या किमतीत 0.29 टक्के प्रति 10 ग्रॅमने घट झाली. सप्टेंबर फ्युचर्स चांदीची किंमत 0.17 टक्के प्रति किलोने कमी झाली.

Gold Price Today: जन्माष्टमीच्या दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी घट, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचा भाव
gold

नवी दिल्लीः Gold/Silver Price Today: देशभरात आज कृष्ण जन्माष्टमी (Krishna Janmashtami 2021) चा सण साजरा केला जात आहे. मजबूत रुपया आणि सकारात्मक जागतिक संकेतांमुळे आज भारतात सोने आणि चांदीच्या किमती कमी झाल्यात. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) ऑक्टोबर फ्युचर्समध्ये सोन्याच्या किमतीत 0.29 टक्के प्रति 10 ग्रॅमने घट झाली. सप्टेंबर फ्युचर्स चांदीची किंमत 0.17 टक्के प्रति किलोने कमी झाली.

डॉलरच्या तुलनेत रुपया 31 पैशांनी वाढून 73.38 वर

सोमवारी रुपया खूप वाढला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 31 पैशांनी वाढून 73.38 वर गेला. शुक्रवारी भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 10 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला, ज्यामुळे भारतात सोन्याची आयात स्वस्त झाली. भारतातील सोन्याच्या किमतींमध्ये 10.75 टक्के आयात शुल्क आणि 3 टक्के जीएसटी समाविष्ट आहे. मागील सत्रात सोन्याने एका महिन्याच्या उच्चांकाला सुमारे 300 रुपयांनी प्रति 10 ग्रॅम गाठले होते.

सोने आणि चांदीची नवीन किंमत (Gold/Silver Price on 30 August 2021)

सोमवारी एमसीएक्सवरील ऑक्टोबर फ्युचर्स सोन्याचे भाव 137 रुपयांनी कमी होऊन 47,401 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. स्पॉट सोने 0.2 टक्क्यांनी वाढून 1,819.17 डॉलर प्रति औंस झाले. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी शुक्रवारी जॅक्सन होल आर्थिक परिषदेत आर्थिक सहाय्य सुलभ करण्याबाबत वेळेवर मार्गदर्शन करणे थांबवल्यानंतर जागतिक बाजारात सोन्याचे दर आज एका महिन्याच्या उच्चांकावर पोहोचले. त्याचबरोबर सप्टेंबर वायदा चांदीचा भाव 105 रुपयांनी घसरून 63,480 रुपये प्रति किलो झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत 0.3 टक्क्यांनी वाढून 24.07 डॉलर प्रति औंस झाली.

सॉवरेन गोल्ड बाँड विक्री आजपासून सुरू

सॉवरेन गोल्ड बाँड योजनेच्या सहाव्या सीरिजची सुरुवात आजपासून सुरू झाली. तुम्ही यामध्ये 3 सप्टेंबर 2021 पर्यंत गुंतवणूक करू शकता. सॉवरेन गोल्ड बाँड (SGB) साठी इश्यू किंमत 4,732 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आलीय. ऑनलाईन अर्ज करणाऱ्या आणि डिजिटल पद्धतीने पैसे भरणाऱ्या गुंतवणूकदारांना सरकार 50 रुपयांची सूट देत आहे. ऑनलाईन किंवा डिजिटल पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट मिळेल. अशा स्थितीत तुम्ही 10 ग्रॅम सोन्यावर 500 रुपयांच्या सूटचा लाभ घेऊ शकता.

संबंधित बातम्या

Post Office च्या 9 जबरदस्त योजना, कोणत्या योजनेत किती दिवसात पैसे दुप्पट होणार?

15 हजार रुपये वाचवण्यावर दरमहा 1 लाख पेन्शन, जाणून घ्या खास सरकारी योजना

Gold Price Today: Big drop in gold price on Janmashtami day, check 10 gram gold price

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI