लगातार तिसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, बुधवारी 6 नोव्हेंबरला काय राहिला भाव?

सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी आज घसरण झाली. 24 आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत कमी झाली आहे. आज 6 नोव्हेंबरला 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने 80,200 रुपये आणि चांदी 96,900 रुपये प्रति किलो आहे. दिवाळीपासून सोन्या-चांदीच्या दरात उतार-चढाव येत आहे. जागतिक बाजारपेठेतील आणि अमेरिकी निवडणुकीचा यावर परिणाम झाला आहे.

लगातार तिसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, बुधवारी 6 नोव्हेंबरला काय राहिला भाव?
goldImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 7:26 PM

सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. 24 आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत आज सलग तिसऱ्या दिवशीदेखील कमी झालेली बघायला मिळाली. सोन्याचा भाव आज 6 नोव्हेंबरला 80,200 रुपयेव प्रति 10 ग्रॅम असा राहिला आहे. तर चांदीचा दर हा 96,900 रुपेय प्रति किलो आहे. चांदीच्या दरात आज कोणताही बदल झाला नाही. पण सोन्याचे दर हे कालपेक्षा 150 रुपयांनी कमी झाले. सोने-चांदीच्या किंमतीत दिवाळीपासून चढ-उतार होत आहेत. जागितक बाजारपेठेतील उतार-चढाव त्याला कारणीभूत असल्याची माहिती आहे. यामध्ये अमेरिकेची निवडणूक हे देखील महत्त्वाचं कारण आहे. अमेरिकेची निवडणूक आणि फेडरल रिझर्व्हच्या निर्णयानतर सोन्याच्या दरात स्थिरता येण्याची शक्यता आहे

मुंबई आणि देशात सोन्याचे दर काय?

सोन्याचे आजचे दर सांगयाचे झाले तर दिल्ली, नोएडा, गाजियाबाद, लखनऊ, जयपूर या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर हे 80,380 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. तर 22 कॅरेट सोन्याचे दर हे 73,690 प्रति 10 ग्रॅम असे होते. पाटणा आणि अहमदाबादमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर हे 80,280 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याचे दर 73,590 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके होते. मुंबई, भुवनेश्वर, कोलकाता इथे सोन्याचे दर हे सारखेच होते. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर हा 80,230 प्रति 10 ग्रॅम असा होता. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 73,540 रुपये प्रति 10 ग्रॅम असा होता.

ग्राहकांना काहीसा दिलासा

दिवाळीत लक्ष्मीपूजनच्या दिवशी सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा दर हा तब्बल 81,000 रुपये प्रति 10 ग्रॅम इथपर्यंत पोहोचला होता. तर चांदीचे दर ही 1 लाखापर्यंत पोहोचले होते. पण नंतर सोने-चांदीच्या दरात सातत्याने घसरण सुरु झाली. गेल्या तीन दिवसांपासून सोन्याचे दर खाली घसरले आहेत. त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सोन्याचे दर कमी झाल्याने आता अनेक ग्राहक सोने खरेदी करु शकतात.

हे सुद्धा वाचा

सोन्याचे दर कसे निश्चित होतात?

देशभरात वेगवेगळ्या गष्टींवरुन सोन्याचे दर निश्चत होतात. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची स्थिती काय आहे यावरुनही सोन्याचे दर ठरतात. जागतिक बाजारत सोन्याचा दरात वाढ होते तेव्हा भारतातही त्याचे परिणाम बघायला मिळतात. याशिवाय सणासुदीच्या काळात अनेकांकडून सोने खरेदी केली जाते. त्यामुळे सोन्याची मागणी वाढते. परिणामी सोन्याच्या किंमतीत वाढ होते.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.