AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price: सोन्याचा भाव वधारला, पण अद्यापही 47 हजाराखालीच

Gold price | 22 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 120 रुपयांनी वाढली. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 1200 रुपयांनी वाढला. त्यामुळे 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत अनुक्रमे प्रतितोळा 46400 आणि 47400 रुपये  इतकी झाली.

Gold Price: सोन्याचा भाव वधारला, पण अद्यापही 47 हजाराखालीच
गोल्ड एक्स्चेंजमुळे शेअर मार्केटप्रमाणे सोन्याचे व्यवहार होतील. एका गोल्ड रिसीटच्या माध्यमातून खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार पार पडतील. गोल्ड एक्स्चेंजमुळे सोन्याची किंमत आणि गुणवत्ता याची खात्री असेल.
| Edited By: | Updated on: Jul 06, 2021 | 11:12 AM
Share

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून एका विशिष्ट मर्यादेत वरखाली होत असलेले सोन्याच्या किंमतीत मंगळवारी किंचीत वाढ पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सेंजवर (MCX) 22 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 120 रुपयांनी वाढली. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 1200 रुपयांनी वाढला. त्यामुळे 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत अनुक्रमे प्रतितोळा 46400 आणि 47400 रुपये  इतकी झाली. (Gold price on MCX)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने भारतीय वायदा बाजारात त्याचे पडसाद उमटले होते. सोमवारी मल्टी कमोजिटी एक्स्चेंज मार्केटमध्ये (MCX) आज सोने (Gold) 23 रुपयांनी वधारून 47308 च्या स्तरावर जाऊन पोहोचले. तर चांदीच्या किंमतीमध्येही तेजी पाहायला मिळाली. त्यामुळे चांदीचा प्रतिकिलो भाव 382 रुपयांनी वाढून 69500 रुपयांच्या पातळीवर पोहोचला होता.

डिसेंबर महिन्यापर्यंत सोन्याचा भाव 52 हजारांपर्यंत पोहोचणार?

गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचा दर एका विशिष्ट पातळीत वरखाली होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव असून सोने 47 हजारांच्या खाली आले आहे. मात्र, कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या उदयानंतर सोन्याचे भाव (Gold rates) पुन्हा वर जातील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे जाणकारांकडून सोन्याचा दर आणखी खाली आल्यास खरेदीचा सल्ला दिला जात आहे.

सध्या सोन्याचा दर हा दोन महिन्यांतील निच्चांकी पातळीवर आहे. मल्टी कमोडिटी एक्सेंजमध्ये सोन्याच्या किंमतीला 46500 रुपयांच्या पातळीवर भक्कम सपोर्ट आहे. शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा सोन्याचा प्रतितोळा दर 46,615 इतका होता. त्यामुळे सोन्याचा दर सपोर्ट प्राईसच्या अत्यंत जवळ आहे. या पातळीपर्यं पोहोचल्यानंतर सोन्याच्या किंमती पुन्हा वरच्या दिशेने प्रवास सुरु करतील. अशातच कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे अनिश्चिततेच्या वातावरणात आणखी भर पडली आहे. त्यामुळे येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत सोन्याच्या किंमती 52 हजाराचा टप्पा गाठतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.

संबंधित बातम्या:

BISच्या वेबसाईटवर हॉलमार्किंगची माहिती गायब; व्यापाऱ्यांनी ‘या’ केंद्रीय मंत्र्याला पाठवले पत्र

Gold Hallmarking च्या नियमांविषयी संभ्रमाचे वातावरण, व्यापारी नाराज

Gold: देशात एप्रिल-मे महिन्यात सोन्याची प्रचंड आयात; भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका

(Gold price on MCX)

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.