Gold Silver latest price: सोन्याचा भाव पुन्हा वधारला, जाणून घ्या आजचा दर

Gold Rates | गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचा दर एका विशिष्ट पातळीत वरखाली होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव असून सोने 47 हजारांच्या खाली आले आहे.

Gold Silver latest price: सोन्याचा भाव पुन्हा वधारला, जाणून घ्या आजचा दर
जर कोणाला फिजिकल सोने हवे असेल तर ईजीआरला तिजोरीत सरेंडर करावे लागेल. वॉल्ट मॅनेजर ग्राहकाला EGR घेऊन फिजिकल सोने देईल, तिथे EGR रद्द होईल. रद्द केलेल्या ईजीआरची माहिती एक्सचेंज, डिपॉझिटरी, क्लिअरिंग कॉर्पोरेशनलाही पाठवली जाईल. वितरित केलेल्या सोन्याच्या गुणवत्तेवर वाद असल्यास, स्वतंत्र एजन्सीचा अहवाल वैध असेल.
Follow us
| Updated on: Jul 05, 2021 | 2:09 PM

मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने भारतीय वायदा बाजारात त्याचे पडसाद उमटत आहेत. मल्टी कमोजिटी एक्स्चेंज मार्केटमध्ये (MCX) आज सोने (Gold) 23 रुपयांनी वधारून 47308 च्या स्तरावर जाऊन पोहोचले. तर चांदीच्या किंमतीमध्येही तेजी पाहायला मिळाली. त्यामुळे चांदीचा प्रतिकिलो भाव 382 रुपयांनी वाढून 69500 रुपयांच्या पातळीवर पोहोचला. (Gold and Silver rates in Mumbai)

डिसेंबर महिन्यापर्यंत सोन्याचा भाव 52 हजारांपर्यंत पोहोचणार?

गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचा दर एका विशिष्ट पातळीत वरखाली होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव असून सोने 47 हजारांच्या खाली आले आहे. मात्र, कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या उदयानंतर सोन्याचे भाव (Gold rates) पुन्हा वर जातील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे जाणकारांकडून सोन्याचा दर आणखी खाली आल्यास खरेदीचा सल्ला दिला जात आहे.

सध्या सोन्याचा दर हा दोन महिन्यांतील निच्चांकी पातळीवर आहे. मल्टी कमोडिटी एक्सेंजमध्ये सोन्याच्या किंमतीला 46500 रुपयांच्या पातळीवर भक्कम सपोर्ट आहे. शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा सोन्याचा प्रतितोळा दर 46,615 इतका होता. त्यामुळे सोन्याचा दर सपोर्ट प्राईसच्या अत्यंत जवळ आहे. या पातळीपर्यं पोहोचल्यानंतर सोन्याच्या किंमती पुन्हा वरच्या दिशेने प्रवास सुरु करतील. अशातच कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे अनिश्चिततेच्या वातावरणात आणखी भर पडली आहे. त्यामुळे येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत सोन्याच्या किंमती 52 हजाराचा टप्पा गाठतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.

भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीला गळती

कोरोना संकटामुळे एकीकडे भारतीय अर्थव्यवस्था रोडावली असताना परकीय चलनाच्या गंगाजळीत मोठी घट झाल्याने देशाला मोठा झटका बसला आहे. सोन्याच्या दरात (Gold Rate) झालेल्या मोठ्या घसरणीमुळे हा परिणाम पाहायला मिळत आहे. 18 जूनला परकीय चलन गंगाजळी 4.148 अब्ज डॉलर्सच्या विक्रमी पातळीवरुन 603.933 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली आहे.

परकीय मुद्रा भांडारातील युरो, पाऊंड आणि येनच्या या परकीय चलनांच्या विनिमय दरात मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. यापूर्वी 4 जून रोजी Forex Reserves वाढ पाहायला मिळाली होती. कोरोनाच्या संकटकाळातही परकीय गुंतवणुकदारांनी भारतावर विश्वास ठेवला होता. त्यामुळे भारताची परकीय चलनाची गंगाजळी 600 अब्ज डॉलर्सवर जाऊन पोहोचली होती.

संबंधित बातम्या:

BISच्या वेबसाईटवर हॉलमार्किंगची माहिती गायब; व्यापाऱ्यांनी ‘या’ केंद्रीय मंत्र्याला पाठवले पत्र

Gold Hallmarking च्या नियमांविषयी संभ्रमाचे वातावरण, व्यापारी नाराज

Gold: देशात एप्रिल-मे महिन्यात सोन्याची प्रचंड आयात; भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका

(Gold and Silver rates in Mumbai)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.