Gold Price | सर्वोच्च दरांच्या तुलनेत सोने 16 टक्क्यांनी घसरले, गुंतवणुकीची योग्य वेळ केव्हा? वाचा सविस्तर…

ऑगस्ट 2020मध्ये सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 56200 रुपयांपर्यंत (आतापर्यंतची सर्वोच्च पातळी) पोहोचली होती, जी आता 46800च्या पातळीवर आहे. सर्वोच्च दरांच्या तुलनेत सोने 16 टक्क्यांनी घसरले आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:29 AM, 24 Feb 2021
Gold Price | सर्वोच्च दरांच्या तुलनेत सोने 16 टक्क्यांनी घसरले, गुंतवणुकीची योग्य वेळ केव्हा? वाचा सविस्तर...
गेल्या काही महिन्यांपासून सोने-चांदीच्या दरात वाढ कायम असल्याने सोने 47 हजारांच्या पुढेच होते मात्र सोने 46900 रुपयांवर आले.

मुंबई : गेल्या वर्षी अर्थात 2020मध्ये सोन्याने 30 टक्के इतका चांगला परतावा दिला होता. ऑगस्ट 2020मध्ये सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 56200 रुपयांपर्यंत (आतापर्यंतची सर्वोच्च पातळी) पोहोचली होती, जी आता 46800च्या पातळीवर आहे. सर्वोच्च दरांच्या तुलनेत सोने 16 टक्क्यांनी घसरले आहे. अशा परिस्थितीत गुंतवणुक करण्याची हीच योग्य वेळ आहे का?, हा प्रश्न गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा ठरतो. शेअर बाजार देखील 52500च्या पातळीवर पोहोचल्यानंतर करेक्शन मोडमध्ये आहे. सध्या तो 49900 रेंजमध्ये ट्रेड करत आहे. तज्ज्ञांच्या मते,  बाँड यील्डमध्ये वाढ झाल्यामुळे महागाईचा दर वाढण्याची अपेक्षा आहे आणि शेअर बाजारामध्ये आणखी काही सुधारणा दिसून येईल (Gold rate corrected 16 percent from august high know the right time to investment).

गेल्या सहा महिन्यांत सोन्याच्या किंमतीत तब्बल 10 हजार रुपयांची घट झाली आहे. या घसरणीबाबत, आयबीजेए, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे सुरेंद्र मेहता म्हणतात की, किंमती सुधारण्याची अनेक कारणे आहेत. अमेरिकन डॉलर जगातील इतर चलनांच्या तुलनेत मजबूत होत आहे. जेव्हा डॉलर मजबूत असतो, तेव्हा सोन्याचे भाव कमी होतात. या व्यतिरिक्त अमेरिकेच्या बाँड मार्केटमध्ये व्याज दरात वाढ झाली आहे, ज्यामुळे सोन्याच्या दरावरील दबाव वाढत आहे.

अलिकडच्या काळात क्रिप्टोकरन्सीमध्येही गुंतवणुकदारांची आवड देखील वाढली आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार जोखीम घेतात आणि डिजिटल चलनातही गुंतवणूक करतात. ते म्हणतात की, या सर्व कारणांमुळे सोन्याच्या किंमतीत घट होत आहे. परंतु, येत्या काही दिवसांत ही गती वाढेल आणि ज्यांना सुरक्षित गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी सोन्यात गुंतवणुक करण्याची सुवर्ण संधी आहे. अमेरिकेने ‘स्टिम्युलस पॅकेज’ जाहीर केल्यानंतर सोन्याच्या किंमतीत वाढ होईल, असा विश्वास आहे.

अमेरिकन बेंचमार्क बाँड यील्डमधील तेजीमुळे सोन्याचे दर पडले फिके!

मिंटमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात पर्यायी गुंतवणुकीचे वरिष्ठ फंड मॅनेजर चिराग मेहता यांनी म्हटले आहे की, अमेरिकेच्या बाँड यील्डमधील वाढीमुळे सोन्याच्या किंमतीत घट झालेली दिसून येते. ऑगस्ट 2020मध्ये अमेरिकेच्या दहा वर्षांच्या बेंचमार्क बाँडचे उत्पन्न 0.60 टक्के होते, जे आता वाढून 1.37 टक्क्यांवर गेले आहे. चिराग म्हणतात की, अमेरिकन फेडरलला हे यील्ड वाढावे, असे वाटत नसेल. अर्थव्यवस्थेत पुन्हा सुधार येण्यासाठी बाँड यील्डमध्ये उतार होणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत फेडरल रिझर्व अशी उपाययोजना करेल, ज्यामुळे हे यील्ड कमी होईल आणि नंतर सोन्याला पुन्हा एकदा झळाळी येईल. यील्ड म्हणजे व्याज दर (Gold rate corrected 16 percent from august high know the right time to investment).

6-12 महिन्यांत सोने 56500च्या पातळीवर पोहोचू शकते!

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या ​​कमोडिटी रिसर्चच्या नवनीत दमानी यांचे म्हणणे आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने सध्या 1800 डॉलर्सने भक्कम स्थानावर आहे. मीडियम टर्ममध्ये हे  2150 डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. त्या म्हणाले की, आयात शुल्कामध्ये 5% कपात केल्यामुळे सोन्याच्या किंमतीतही घसरण दिसून येत आहे. परंतु, येत्या 6-12 महिन्यांत ती 56500 किंवा त्याहून अधिक वर जाऊ शकते. कमोडिटी मार्केटचे तज्ज्ञ अजूनही म्हणतात की, सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ होईल, म्हणून ही गुंतवणुकीची सुवर्णसंधी आहे.

डिलिव्हरी सोने आणि चांदीची किंमत

MCXवर सकाळी 10.15 वाजता एप्रिल डिलीव्हरीच्या सोन्याचा भाव 8 रुपयांनी वाढून, 46810 रुपये प्रति दहा ग्रॅम होता, तर जून डिलिव्हरीचे सोने काल 46940च्या पातळीवर ट्रेड होत होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा भाव 2.40 डॉलर (+0.13%) वाढीसह प्रति औंस 1808.30 डॉलरवर होता. यावेळी, मार्च डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव MCXवर 181 रुपयांच्या वाढीसह प्रति किलो 69522 रुपयांवर होता. त्याचप्रमाणे मे डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव 169 रुपयांनी घसरून 70790 रुपये प्रतिकिलो आणि जुलैच्या डिलिव्हरी चांदीचा भाव 182 रुपयांनी वाढून 72083च्या पातळीवर होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांदी सध्या 0.074 डॉलर (+ 0.27%) वाढीसह 27.76 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर व्यापार करत आहे. यात 1 औंस म्हणजे 28.34 ग्रॅम आहे.

(Gold rate corrected 16 percent from august high know the right time to investment)

हेही वाचा :

1 लाखात सुरू करा बिझनेस; महिन्याला 2 लाख कमावा, एक नंबर आहे Business Idea

Salary Hike in 2021: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; यंदा मोठी पगारवाढ होणार