Gold Rate Today | सोने खरेदीदारांना मोठा झटका, एक आठवड्यात वाढले इतके भाव? एका तोळा सोन्यासाठी मोजावे लागतील एवढे पैसे

Gold Rate Today | गेल्या पाच महिन्यांत, सोन्यासाठी हा सर्वात मजबूत आठवडा राहिला. वायदे बाजारातील तज्ज्ञांच्या मते, सोन्याचे दर पुन्हा कडाडणार आहे. सोने पुन्हा चमक दाखवणार आहे.

Gold Rate Today | सोने खरेदीदारांना मोठा झटका, एक आठवड्यात वाढले इतके भाव? एका तोळा सोन्यासाठी मोजावे लागतील एवढे पैसे
सोन्याचे दर वाढले
Image Credit source: सोशल मीडिया
कल्याण माणिकराव देशमुख

|

Jul 31, 2022 | 11:37 AM

Gold Rate Today | अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने (Federal Reserve) मंदीच्या (Recession) भीतीने पुन्हा एकदा व्याजदर (Interest Rate) वाढवले आहेत. मंदीच्या भीतीने केंद्रीय बँकेने दुसऱ्यांदा हा उपाय योजला आहे. त्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर ही परिणाम दिसत आहे. बाजाराच्या अनुषंगाने बँकेने व्याजदरात 75 बेसिस पॉइंट्सने वाढ केली खरी पण डॉलर (Dollar) कमकूवत झाला. परिणामी या आठवड्यात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ (Gold Rate Today) झाली आहे. देशांतर्गत बाजारात, एमसीएक्सवर(MCX), या आठवड्यात सोन्यामध्ये 1.54 टक्क्यांची उसळी नोंदवली गेली आणि सोन्याचे दर 51,426 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले. गेल्या आठवड्यात हाच दर 50,644 रुपयांवर बंद झाला होता .अशाप्रकारे, साप्ताहिक आधारावर सोन्याच्या दरात 782 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात 2.26 टक्क्यांची वाढ झाली आणि सोने 1765 डॉलर प्रति औंसवर बंद झाले.

चांदीच्या दरामध्ये , स्थानिक बाजारातील एमसीएक्सवर(MCX), चांदी (Silver Price Today) साप्ताहिक आधारावर 5.88 टक्क्यांनी वाढून 58,370 रुपये प्रति किलोवर बंद झाला. तीन आठवड्यांतील ही सर्वोच्च पातळी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी 9.47 टक्क्यांच्या वाढीसह 20.32 डॉलर प्रति औंसवर बंद झाली. गेल्या पाच आठवड्यांतील ही सर्वोच्च पातळी आहे.

दुसऱ्या सहामाहीत सोने वाढण्याची अपेक्षा

सोन्या-चांदीच्या दर वाढीबाबत आयआयएफएल सिक्युरिटीजचे अनुज गुप्ता म्हणाले की, यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 75 आधार अंकांची वाढ केली आहे. पण सप्टेंबर आणि त्यानंतर व्याजदरात तेवढी आक्रमक वाढ न करण्याचा दिलासा मध्यवर्ती बँकेने दिला आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था सलग दुसऱ्या तिमाहीत घसरली. त्यामुळे सोन्याच्या मागणीतही वाढ झाली आहे.

हा आठवडा सर्वात मजबूत

सोन्यासाठी गेल्या पाच महिन्यांतील हा सर्वात मजबूत आठवडा ठरला आहे. तसे पाहता अमेरिकेची अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट पसरले आहे. जून तिमाहीत अमेरिकेची अर्थव्यवस्था 0.9 टक्क्यांनी घसरली. पहिल्या तिमाहीत ही घट 1.6 टक्के होती. जागतिक अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या स्थितीत सराफा बाजारात सोन्याची मागणी कायम राहण्याची शक्यता आहे, असे जागतिक सुवर्ण परिषदेचे मत आहे. दुसऱ्या सहामाहीत सोन्याची मागणी वाढण्याची आणि सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

24, 22, 21, 18 आणि 14 कॅरेटमध्ये काय असतो फरक

24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं. इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात. त्याचबरोबर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें