AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोने ठरले अक्षय धन, दिला 35 टक्के रिटर्न, आता खरेदी करावे की विक्री, ग्राहकांत संभ्रम

Gold Rate Today : टॅरिफ वॉर भडकले तर सोने 1,38,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. गेल्या एका वर्षात महागाई, जगभरातील ताणतणाव, केंद्रीय बँकांची सततची खरेदी यामुळे सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. सोने खऱ्या अर्थाने अक्षय धन ठरले आहे.

सोने ठरले अक्षय धन, दिला 35 टक्के रिटर्न, आता खरेदी करावे की विक्री, ग्राहकांत संभ्रम
सोन्याची काय खेळीImage Credit source: गुगल
| Updated on: Apr 26, 2025 | 10:11 AM
Share

गेल्या वर्षी अक्षय तृतीया 10 मे 2024 रोजी होती. तेव्हा 10 ग्रॅम सोन्याचा भाव 73 हजार रुपये इतका होता. यावेळी अक्षय तृतीयेपूर्वीच सोन्याने 1 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. एका वर्षात सोन्याने गुंतवणूकादारांना मोठा फायदा करून दिला आहे. अनेक तज्ज्ञ सोन्याचे भाव कमी होण्याची शक्यता वर्तवत आहेत. त्यांचया मते अगोदर सोने 75 हजार रुपयांवर येऊ शकते. नंतर ते 55 हजारांवर येईल तर काहींनी टॅरिफ वॉरकडे लक्ष वेधले आहे. त्यांच्या मते, जर अमेरिका आणि चीनमध्ये लवकरच तोडगा निघाला नाही तर सोन्याचा भाव 1,38,000 प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहचेल. गेल्या एका वर्षात महागाई, जगभरातील ताणतणाव, केंद्रीय बँकांची सततची खरेदी यामुळे सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. सोने खऱ्या अर्थाने अक्षय धन ठरले आहे.

सोन्याची विक्री की खरेदी?

मनीकंट्रोल संकेतस्थळातीनुसार, सोने खरेदी करावे की विक्री याविषयी ग्राहकांत संभ्रम आहे. तज्ज्ञांच्या मते सध्या मोठा फायदा होत आहे, म्हणून लागलीच सोन्याची विक्री करणे हे घाईचे ठरेल. फारच गरज असेल तर थोडेफार सोने विक्री करावी. पण सर्वच सोने विक्रीची घाई करू नये. आयबीजेएचे उपाध्यक्ष अक्ष काम्बोज यांनी सुद्धा सर्व सोने विक्री करणे अयोग्य असल्याचे म्हटले आहे.

सोने खरेदीविषयी तज्ज्ञांनी थोडा सबुरीचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसात सोन्यात मोठ्या घसरणीची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सोने खरेदी ही धोक्याची ठरू शकते. टॅरिफ वॉरचा मुद्दा जितका चिघळेल. तितके सोने चमकले. पण अमेरिका आणि चीन या दोघांना हा मुद्दा जास्त ताणणे फायद्याचे नाही हे माहिती आहे. त्यामुळे सोने खरेदी करताना काळजी घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

सोन्यात घसरणीचे सत्र

या आठवड्यात सोन्यात घसरण दिसून आली. सोने जवळपास 500 रुपयांच्या जवळपास स्वस्त झाले आहे. सोमवारी सोन्याने 700 रुपयांनी वधारले होते. 22 एप्रिल रोजी सोने 300 रुपायांनी वाधले होते. बुधवारी सोने 300 रुपयांनी तर गुरुवारी 160 रुपयांनी स्वस्त झाले. आज सकाळच्या सत्रात सोन्यात घसरण दिसून आली आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 90,170 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 98,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी नरमली

चांदी पण नरमली आहे. चांदी 1 लाख 5 हजारांच्या घरात पोहचली होती. त्यानंतर चांदीत घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,00,900 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 95,631, 23 कॅरेट 95,248, 22 कॅरेट सोने 87,598 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 71,723 रुपये, 14 कॅरेट सोने 55,944 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 97,684 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

Follow Us
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर