ती एकच चाल आणि सोन्यात धूमधडाम! भाव गडगडणार, आता किंमत काय?
Gold Rate Today : जागतिक बाजारात टॅरिफ वॉरची धग कायम आहे. चीनने मोठी चाल खेळली, त्यामुळे डॉलर कमकुवत झाला. सोन्याचे दाम पुन्हा वधारले. जागतिक घडामोडींमुळे ग्राहकांना मोठा फटका बसत आहे. पण सोन्यात मोठी घसरण येईल, असा दावा काही तज्ज्ञ करत आहेत.

Gold Price News : सोन्याच्या किंमतींनी मोठी झेप घेतली आहे. सोन्याने एक लाखांचा टप्पा ओलांडल्यानंतर गेल्या दोन दिवसांत घसरण दिसली. सोन्याने मोठी मजल मारल्याने ग्राहक धास्तावले आहेत. आता सोने 1.50 लाखांचा टप्पा गाठेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर काही तज्ज्ञ सोने पुन्हा जमिनीवर येईल असा अंदाज वर्तवला आहे. अमेरिका आणि चीनमधील व्यापारी खेळीमुळे सोने चमकल्याचा दावा करण्यात येत आहे. दोन्ही देशातील व्यापारी संबंध सुरळीत झाल्यास सोन्यात मोठी घसरण दिसेल असा दावा करण्यात येत आहे.
तर सोन्याची दरवाढ ठरेल केवळ एक कहाणी
सीएनबीसी इंटरनॅशनलशी बोलताना ट्रेडर Tai Wong ने सोन्याच्या दरवाढीविषयी मोठे भाकीत केले आहे. त्यानुसार, टॅरिफ वादाचे हे पडसाद आहे. चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापार युद्धाचा हा परिणाम असल्याचा दावा करण्यात येत आहे. चीनने एक खेळी करत डॉलर कमकुवत केला. त्यामुळे जागतिक बाजारात सोने 3500 डॉलरने वधारले.
सध्या अमेरिका आणि चीन या दरम्यान व्यापार बाबत कोणतीही कोंडी फुटलेली नाही. चीनच्या दाव्यानुसार टॅरिफ वॉरवर दोन्ही देशांमध्ये कोणतीही चर्चा सुरू नाही. अमेरिकेने एकतर्फी लादलेले शुल्काचे ओझे हटवले पाहिजे अशी मागणी चीनने केली आहे. तर दुसरीकडे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि केंद्रीय बँक फेड रिझर्व्हरचे चेअरमन यांच्यात वाद सुरू आहे. या दोन मुद्यांवर जर तोडगा निघाला तर सोन्याची दरवाढ आटोक्यात येईल आणि भाव घसरतील, असा दावा करण्यात येत आहे.
घसरणीमुळे ग्राहकांना दिलासा
या आठवड्यात गेल्या दोन दिवसांपासून सोने 460 रुपयांनी स्वस्त झाले. सोमवारी सोन्याने 700 रुपयांची भरारी घेतली होती. 22 एप्रिल रोजी सोने 300 रुपयांनी महागले होते. बुधवारी सोने 300 रुपयांनी तर गुरुवारी 160 रुपयांनी स्वस्त झाले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 90,200 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 98,340 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीचा पण ग्राहकांना दिलासा
चांदी एक लाखांच्या आत येण्याची चिन्हं आहेत. यापूर्वी चांदी 1 लाख 5 हजारांच्या घरात पोहचली होती. त्यानंतर चांदीत घसरण दिसून आली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,00,900 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 96,286, 23 कॅरेट 95,900, 22 कॅरेट सोने 88,198 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 72,215 रुपये, 14 कॅरेट सोने 56,327 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 97,634 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
