Gold Rate Today : ग्राहकांसाठी आनंदवार्ता, सोन्याचा युटर्न, दरात मोठी घसरण
Jalgaon Gold Price Today : सुवर्णनगरी जळगावमध्ये ग्राहकांना सोन्याने दिलासा दिला. जळगावच्या सराफ बाजारात सोन्यात दरात मोठी घसरण झाली आहे. या घडामोडींमुळे सोन्याचे दर 1 लाखांच्या आत आले आहेत. सोन्यात मोठ्या घसरणीचा दावा तज्ज्ञ करत आहे.

सुवर्णनगरी जळगावमध्ये ग्राहकांना सोन्याने मोठा दिलासा दिला. जळगावच्या सराफ बाजारात सोन्यात दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्यात मोठी तेजी दिसून आली. सोन्याने सराफा बाजारात लाखांचा टप्पा ओलांडला होता. तर वायदे बाजारात सोन्याला एक लाखांचा टप्पा गाठता आला नाही. अमेरिकन वायदे बाजारात सोन्याचे भविष्यातील सौदे कमी दरावर नोंदवले गेले. या घडामोडींमुळे सोन्याचे दर 1 लाखांच्या आत आले आहेत. सोन्यात मोठ्या घसरणीचा दावा तज्ज्ञ करत आहे.
जळगावमध्ये सोन्याच्या दरात मोठी घसरण
जळगावच्या सराफ बाजारात सोन्यात दरात मोठी घसरण झाली आहे सोन्याच्या दरात तब्बल अडीच हजाराची घसरण झाली असून सोन्याचे दर 1 लाखांच्या आत आले आहेत. 1 लाखांचा आकडा पार झालेल्या सोन्याचे दर जीएसटी सह 99 हजार रुपयांवर आले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या सोने भाववाढीला काहीसा ब्रेक लागला आहे.
अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्ध काहीसे सौम्य होण्याची शक्यता निर्माण झाली असून, तशी तयारी अमेरिकेनेही दाखविली आहे. त्यामुळे सोने भाव कमी झाल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे. सोन्याच्या दरात दोन हजार ४०० रुपयांची घसरण झाली असल्याने त्यामुळे ग्राहकांना काही अंशी तरी दिलासा मिळाला आहे.
सोने 300 रुपयांनी स्वस्त
गेल्या आठवड्यात सोने 2300 रुपयांनी महागले होते. तर सोमवारी सोन्याने 700 रुपयांची भरारी घेतली होती. 22 एप्रिल रोजी सोने 300 रुपयांनी महागले होते. तर काल त्यात तितकीच घसरण झाली. तर आज सकाळच्या सत्रात सोन्यात 160 रुपयांची घसरण दिसत आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 90,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 98,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीत किंचित घसरण
सोन्यासोबत चांदीने पण चांगलीच चमक दाखवली होती. चांदीने पुन्हा लाखांचा टप्पा ओलांडला आहे. यापूर्वी चांदी 1 लाख 5 हजारांच्या घरात पोहचली होती. त्यानंतर चांदीत घसरण दिसून आली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,01,000 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 96,085, 23 कॅरेट 95,700, 22 कॅरेट सोने 88,014 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 72,064 रुपये, 14 कॅरेट सोने 56,210 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 96,613 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
