Gold Rate : 7 महिन्यात भारतात कुणी आणले 64000 किलो सोने? येथे 1 ग्रॅम घेताना फुटतो घाम, आता तर क्विंटलमध्ये सौदा
Big Gold Stock : दिवाळीच्या तोंडावर सोने आणि चांदीच्या भावात, किंमतीत तुफान आले होते. दोन्ही धातुच्या किंमतीत गगनाला भिडल्या होत्या. आता दोन्ही धातुचे भाव गडगडले आहेत. पण मार्च 2025 ते सप्टेंबर 2025 या काळात भारतात 64 टन सोने कोणी आणले?

दिवाळीच्या तोंडावर सोने आणि चांदीने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवले. या वेळी किंमतीत तुफान वाढ झाली. 10 ग्रॅम सोने 1 लाख 32 हजारांच्या पुढे तर चांदी दोन लाखांच्या घरात पोहचली होती. पण त्यानंतर सोने आणि चांदीत धडामधूम झाले. दोन्ही धातुचे भाव गडगडले. पण मार्च 2025 ते सप्टेंबर 2025 या काळात भारतात 64 टन सोने कोणी आणले? हे 64000 हजार किलो सोने कुठून आणि का भारतात आणण्यात आले, याची देशभर चर्चा होत आहे.
भारतात 7 महिन्यात कोणी आणले 64 टन सोने?
भारतात RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 7 महिन्यात 64 टन सोने देशात आणले. भारताच्या मध्यवर्ती बँकेने सप्टेंबर 7 तारखेपर्यंत 64 हजार किलो सोने परत आणले. हे सोने विविध देशांच्या बँकात ठेवले होते. सध्याच्या भूराजकीय परिस्थितीचा आणि अमेरिकन टॅरिफचा विचार करता भारताने हे मोठे पाऊल टाकल्याचे म्हटले जाते.
सप्टेंबर अखेरपर्यंत 880.8 टन सोन्यापैकी, RBI 575.8 टन सोने भारतात आणण्यात आले आहे. तर 290.3 टन सोने हे सध्या बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्स (BIS) कडे ठेवण्यात आले आहे. याशिवाय RBI कडे गोल्ड डिपॉजिट म्हणून 14 टन सोने साठा आहे.
मार्च 2023 ते आतापर्यंत RBI ने आणले इतके सोने
भारताच्या मध्यवर्ती बँकेने मार्च 2023 ते आत्तापर्यंत 274 टन सोने भारतात परत आणले आहे. यामागे रशियन कनेक्शन आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते, हा निर्णय 2022 मधील रशियाच्या परकीय गंगाजळी गोठवण्याशी संबंधित आहे. जेव्हा अमेरिकेसह काही युरोपियन देशांनी युक्रेनशी युद्ध पुकारल्यानंतर रशियाचे सोने आणि मालमत्ता गोठवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा आपल्या देशाची संपत्ती, मालमत्ता आपल्याच देशात सुरक्षित ठेवण्याचे भान अनेक देशांना आले. मग भारतानेही याच दिशेने पाऊल टाकले. G-7 देशांनी रशियाचे फॉरेन एक्सचेंज रिजर्व्ह केलेले आहे.यावर्षी 31 मार्चपर्यंत, RBI ने 879 टन सोने होते. त्यापैकी 512 टन सोन्याचा साठा देशात ठेवण्यात आला आहे. तर उर्वरीत 348.6 टन सोने हे सध्या बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्स (BIS) कडे ठेवण्यात आलेले आहे.
