AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rates Today : सोन्याची चमक फिकी ! दोन दिवसांत मोठी घसरण, आजचे 10 ग्रॅमचे दर पाहिलेत का ?

Today Gold Rate 5 May 2026 Latest Updates in Marathi : जागतिक बाजारात आणि देशांतर्गतही सोन-चांदी या मौल्यवान धातूंच्या दरात सतत चढउतार होतात. एखाद्या दिवशी खाली घसलेलेल दर दुसऱ्या दिवशी पटकनवरही चढतात. आज 5 मे रोजी सोनं-चांदीची किंमत किती ?

Gold Rates Today : सोन्याची चमक फिकी ! दोन दिवसांत मोठी घसरण, आजचे 10 ग्रॅमचे दर पाहिलेत का ?
| Updated on: May 05, 2026 | 8:43 AM
Share

Gold Rate Today In India : आपल्यापैकी बहुतांश लोकांना सोनं-चांदी खरेदीची आवड असते. अनेकांकडे दागिने असतीलही. पण सध्या सोनं-चांदीचे दर एवढ्या वेगाने वरखाली होत आहेत, की ते घ्यायच्या नावानेही अनेकांना धडकी भरते. अमेरिक आणि इराणच्या युद्धाचा फटका, डॉलरची किंमत या सर्व गोष्टींचा सराफा बाजारावर परिणाम होतो. सध्या शांततेच वातावरण असलं तरी युद्धाचा भडका कधी उडेल याचा नेम नाही, त्यामुळे जागतिक बाजाराही संवेदनशील स्थितीत आहे, त्यामुळे दर वर-खाली होतच राहतात. त्याचा डायरेक्ट परिणाम सोनं आणि चांदीवर झाल्याचं दिसून येतं. आजचे सोन्याचे दरही समोर आले आहेत.

अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने आणि पश्चिम आशियातील तणाव कमी झाल्याने आता सोन्यासारख्या सुरक्षित मालमत्तेची मागणी कमी झाली आहे, ज्यामुळे सोन्याची चमक फिकी पडली आहे. आज, 5 मे रोजी, सोन्याची चमक सलग दुसऱ्या दिवशी फिकी पडली आहे. दिवसभर स्थिर राहिल्यानंतर, सोन्याच्या किमतीत सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. या दोन दिवसांत, 24 कॅरेट सोनं प्रति दहा ग्रॅम 1320 रुपयांनी आणि 22 कॅरेट सोने 1210 रुपयांनी स्वस्त झालं आहे. आज, राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोने प्रति दहा ग्रॅम 10 रुपयांनी आणि 22 कॅरेट सोनंही 10 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर दुसरीकडे चांदीबद्दल बोलायचे झाल्यास, सलग दोन दिवसांच्या स्थिरतेनंतर आज ती दिल्लीत स्वस्त झाली असून, तिच्या दरात प्रति किलो 100 रुपयांनी घट झाली आहे.

प्रमुख शहरांमधील सोन्याचे भाव

देशातील मोठ्या शहरांत 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत किती ते जाणून घेऊया..

शहर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर
दिल्ली ₹1,49,760 ₹1,37,290 ₹1,12,360
मुंबई ₹1,49,610 ₹1,37,140 ₹1,12,210
कोलकाता ₹1,49,610 ₹1,37,140 ₹1,12,210
चेन्नई ₹1,52,720 ₹1,39,990 ₹1,16,790
बंगळुरू ₹1,49,610 ₹1,37,140 ₹1,12,210
हैदराबाद ₹1,49,610 ₹1,37,140 ₹1,12,210
लखनऊ ₹1,49,760 ₹1,37,290 ₹1,12,360
पटना ₹1,49,660 ₹1,37,190 ₹1,12,260
जयपुर ₹1,49,760 ₹1,37,290 ₹1,12,360
अहमदाबाद ₹1,49,660 ₹1,37,190 ₹1,12,260

दोन दिवसांच्या स्थिरतेनंतर चांदीच्या दरात घसरण

चांदीबद्दल बोलायचं झाल्यास, सलग दोन दिवस स्थिर राहिल्यानंतर आज भाव खाली आला आहे. यापूर्वी, सलग दोन दिवसांत एक किलो चांदी 15,00 रुपयांनी महाग झाली होती. आता आजच्या दिवसाबद्दल बोलायचे झाल्यास, दिल्लीत ती 100 रुपयांनी स्वस्त होऊन 2,64,900 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. इतर महत्त्वाच्या महानगरांबद्दल बोलायचे झाल्यास, मुंबई आणि कोलकाता येथेही ती त्याच दराने विकली जात आहे. मात्र, चेन्नईमध्ये एक किलो चांदीचा भाव 2,69,900 रुपये आहे, याचा अर्थ असा की, या चार महानगरांपैकी चेन्नईमध्ये चांदी सर्वात महाग आहे.

सोन्याची कशी होईल वाटचाल ?

WealthMills Securities च्या रिसर्च डायरेक्टर क्रांति बाथिनी यांच्या मते, मजबूत होत असलेला डॉलर आणि कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे सोन्यावर दबाव आहे. जेव्हा कच्चं तेल महाग होतं, तेव्हा डॉलरची मागणी वाढते, ज्याचा परिणाम त्याच्या किमतीवर होतो. याशिवाय, अमेरिकेत व्याजदर कपातीची शक्यता कमी असल्यानेही सोन्यावर दबाव येत आहे.

तर गोल्डमन सॅक्सच्या मते, जागतिक मध्यवर्ती बँकांकडून होणारी सोन्याची खरेदी आणि अमेरिकेतील व्याजदर कमी होण्याच्या अपेक्षेमुळे सोन्याच्या किमती वाढतील. तथापि, गोल्डमन सॅक्सने अल्प कालावधीत किमती नरम होण्याचा अंदाज वर्तवला आहे. गोल्डमन सॅक्सच्या अंदाजानुसार, या वर्षाच्या अखेरपर्यंत सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1.63 लाख रुपये (प्रति औंस 5400 डॉलर) पर्यंत पोहोचू शकते.

Follow Us
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
Sanjay Raut EXCLUSIVE | ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत संजय राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
Sushma Andhare | राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही भ्रमात नाही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
Omraje Nimbalkar | धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या एका निर्णयाने बदलणार राजकीय गणित, घडामोडींना वेग
गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
Viral Photos | गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
Jayant Patil UNCUT | सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; भ्रष्टाचारावरून घणाघात!
एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण... जाधवांनी अधिवेशनाआधीच सरकारला घेरलं
Bhaskar Jadhav UNCUT | एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण...भास्कर जाधवांनी अधिवेशनाआधीच फडणवीस सरकारला घेरलं!
चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा
Bhaskar Jadhav । चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा; भास्कर जाधवांचा सरकारवर थेट हल्लाबोल
वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर....
मोठी बातमी! वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर, भूमिका स्पष्ट करत म्हणाल्या....
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार निर्णायक भेट
ओमराजेंच्या निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, तर ठाकरे गटाची मनधरणी सुरूच
Omraje Nimbalkar | ओमराजेंच्या एका निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, रोखण्यासाठी ठाकरे गटाची मनधरणी सुरूच