AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate Today : मुंबईची आत्या, पुण्याच्या काकू, नाशिकच्या वन्सं घाई करा… सोन्याचे आजचे भाव आधीपेक्षाही… आजचे दर घ्या जाणून

Gold Rate Today 3 April 2026 in Marathi : इस्रायल, अमेरिका वि. इराण यांच्यातील संघर्ष आणखी वाढण्याची भीती वाढली असून, त्यावर लवकर तोडगा निघण्याच्या आशा मावळल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढल्या आहेत. डॉलर 0.5 टक्क्यांनी मजबूत होऊन 99-100 वर पोहोचला आहे. तर सोन्या चांदीचे दर मात्र..

Gold Rate Today : मुंबईची आत्या, पुण्याच्या काकू, नाशिकच्या वन्सं घाई करा… सोन्याचे आजचे भाव आधीपेक्षाही… आजचे दर घ्या जाणून
शुक्रवारी सोनं-चांदीसाठी किती मोजावे लागणार पैसे ?
| Updated on: Apr 03, 2026 | 10:17 AM
Share

गुड फ्रायडेच्या दिवशी आज देशात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे दिसून आलं. आज, शुक्रवार 3 एप्रिलच्या सकाळी, राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,49,110 रुपयांपर्यंत खाली आला आहे. मुंबईत हा भाव प्रति 10 ग्रॅम 1,48,960 रुपये झाला आहे. आदल्या दिवशी, दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 3500 रुपयांनी किंवा 2.26 टक्क्यांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 1 लाख 51 हजार 500 रुपयांवर पोहोचला होता. तर आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याचा भाव प्रति औंस 4,591.52डॉलर इतका आहे.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील दोन ते तीन आठवड्यांत इराणवर मोठा हल्ला करण्याच्या दिलेल्या इशाऱ्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढल्या आहेत. डॉलर 0.5 टक्क्यांनी मजबूत होऊन 99-100 वर पोहोचला आहे. यामुळे परकीय व्यापारात मौल्यवान धातूंच्या किमतींवर दबाव वाढला आहे. इस्रायल, अमेरिका वि इराण यांच्यातील संघर्ष आणखी चिघळण्याची भीती वाढली असून, त्यामुळे जलद तोडगा निघण्याच्या आशा मावळल्या आहेत. अत्यंत महत्त्वाच्या अशा होर्मुझ सामुद्रधुनीतून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आणि वायूच्या वाहतुकीत दीर्घकाळ व्यत्यय येऊ शकतो.

देशातील महत्वाच्या शहरांतील दर

दिल्लीत सोन्याचे भाव : दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1, 49, 910 आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,36,690 रुपये आहे.

मुंबई आणि कलकत्ता : सध्या मुंबईत, कलकत्ता येथे 22 कॅरेट सोन्याचे दर 1,365,40 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,48,960 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चेन्नईमध्ये दिर किती ? : 24 कॅरेट सोन्याचे दर 1,49, 990 रुपये प्रति 10 ग्राम असून 22 कॅरेट सोन्यासाठी 1,37,490 रुपये मोजावे लागत आहेत.

पुणे आणि बंगळुरूत सोन्याचे आज भाव : या दोन शहरांमध्ये, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 148960 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 136540 रुपये आहे.

   शहर   22 कॅरेट सोन्याचे दर   24 कॅरेट सोन्याचे दर
दिल्ली 136690 149110
मुंबई 136540 148960
अहमदाबाद 136590 149010
चेन्नई 137490 149990
कोलकाता 136540 148960
हैदराबाद 136540 148960
जयपुर 136690 149110
भोपाळ 136590 149010
लखनऊ 136690 149110
चंदीगड 136690 149110

चांदीची किंमत

तर आज चांदी या आणखी एका मौल्यवान धातूच्या किमतीतही घसरण होताना दिसली. 3 एप्रिलच्या सकाळी, चांदीची किंमत प्रति किलोग्राम २2, 49,900 रुपयांपर्यंत घसरली. आदल्या दिवशी, दिल्ली सराफा बाजारात चांदीची किंमत 9000 रुपयांनी, म्हणजेच 3.66 क्क्यांनी घसरून प्रति किलोग्राम 2,37,000 रुपयांवर आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा स्पॉट भाव प्रति औंस 69.57 डॉलर आहे. यावर्षी जानेवारीमध्ये चांदीच्या किमतीने 4 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता.

Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय