AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold-Silver Rate Today 30 January 2026 : धाडकन तोंडावर आपटलं सोनं, चांदीचे भावही झटक्यात खाली; आजचे दर किती ?

Gold-Silver Rate Today 30 January 2026 Latest News Updates in Marathi : सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ पहायला मिळत होती, ते सर्सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर जाताना दिसत होतं. मात्र आज, शुक्रवारी सकाळी सोन्या-चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण झालेली पहायला मिळाली.

Gold-Silver Rate Today 30 January 2026 : धाडकन तोंडावर आपटलं सोनं, चांदीचे भावही झटक्यात खाली; आजचे दर किती ?
सोनं-चांदीचे आज दर किती ?
| Updated on: Jan 30, 2026 | 12:00 PM
Share

Gold-Silver Price Crash : गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सुरू असलेला तेजीचा वेग शुक्रवारी अचानक थांबला. तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि वाढत्या किमतींबद्दल काळजीत असाल, तर आजची बातमी तुम्हाला दिलासा देणारी ठरू शकते. 29 जानेवारी रोजी विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर, 30 जानेवारीच्या म्हणजेच आज, शुक्रवारी सकाळी सोनं- चांदी या मौल्यवान धातूंच्या बाजारपेठेत घबराट पसरली होती. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोनं आणि चांदी दोन्हीही मोठ्या प्रमाणात घसरले. गुरुवारी तेजीत असलेल्या बाजारात आज वेगळंच चित्र होतं.

मोठी घसरण

MCX वर सुरुवातीच्या व्यवहारात दोन्ही धातू 5 टक्क्यांहून अधिक घसरले. 30 जानेवारी रोजी सकाळी एमसीएक्सवर सोन्याचा भाव 5.55 टक्क्यांनी घसरून 1,60,001 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. ही घसरण लक्षणीय आहे कारण सोनं अलीकडेच 1,93,096 या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचलं होतं. मात्र आज, सोन्याचे भाव अंदाजे 9 हजार 402 रुपयांनी घसरले आहेत.

दरम्यान, दुसरीकडे चांदीचे दर 4.18 टक्क्यांनी घसरले आणि 1 किलोसाठी चांदीची किंमत 3,83,177 रुपये झाली. चांदीच्या किमतीत फक्त एकाच दिवसात 16,716 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. गुरुवारी चांदीने 4,20,048 रुपये प्रति किलोचा नवा विक्रम प्रस्थापित केला होता, परंतु आजच्या नफा वसुलीमुळे किमती खाली आल्या.

किरकोळ बाजारात परिस्थिती काय ?

आज केवळ फ्युचर्स मार्केटच नाही तर किरकोळ बाजारातही मंदी दिसून आली आहे. सामान्य खरेदीदारांसाठी ही एक चांगी संधी असू शकते. बुलियन वेबसाइटवरील आकडेवारीनुसार, 30 जानेवारी रोजी किरकोळ बाजारात सोन्याचा भाव 5,300 रुपयांनी घसरून 1,65,180 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. दरम्यान, चांदीचा भाव 23,360 रुपयांनी घसरून 3,79,130 रुपये प्रति किलो झाला.

आंतरराष्ट्रीय बाजारातील गोंधळामुळे भारतीय बाजारावरही दबाव निर्माण झाला. जागतिक स्तरावर, स्पॉट गोल्ड 1.65 % घसरून 5,217डॉलर प्रति औंस झाले, जे एका दिवसापूर्वी 5,594.82 २ डॉलरचा विक्रमी उच्चांक होता. त्याचप्रमाणे, स्पॉट चांदीचा भावही 2.86 टक्क्यांनी घसरून 110 डॉलर प्रति औंस झाला.

अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू
अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू.
दोन्ही राष्ट्रवादींच्या एकीकरणावर जयंत पाटलांची मोठी प्रतिक्रिया
दोन्ही राष्ट्रवादींच्या एकीकरणावर जयंत पाटलांची मोठी प्रतिक्रिया.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील; नरहरी झिरवाळ यांचा विश्वास
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील; नरहरी झिरवाळ यांचा विश्वास.
दादांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच?उपमुख्यमंत्रीपदासाठी नाव आघाडीवर
दादांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच?उपमुख्यमंत्रीपदासाठी नाव आघाडीवर.
अवकाळी पावसाचा थयथयाट... वारा एवढा सुटला की पपईची गाडीच उलटली
अवकाळी पावसाचा थयथयाट... वारा एवढा सुटला की पपईची गाडीच उलटली.
विलीनीकरण करुन अजित पवार यांची इच्छा पूर्ण करणार?
विलीनीकरण करुन अजित पवार यांची इच्छा पूर्ण करणार?.
विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून सरकारचा डाव?
विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून सरकारचा डाव?.
शेवटच्याक्षणी पायलटने प्रतिसाद का दिला नाही? विमानात नेमकं काय घडलं?
शेवटच्याक्षणी पायलटने प्रतिसाद का दिला नाही? विमानात नेमकं काय घडलं?.
पवार घराण्यातून नेतृत्व कुणाकडे? राजकीय वारसा कोण चालवणार?
पवार घराण्यातून नेतृत्व कुणाकडे? राजकीय वारसा कोण चालवणार?.
जीवश्य कंठश्य मित्र...; फडणवीसांनी लिहिला भावनिक लेख!
जीवश्य कंठश्य मित्र...; फडणवीसांनी लिहिला भावनिक लेख!.