AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीचा सुखद धक्का, सराफा बाजारात गोडवा वाढला

Gold Silver Rate Today: दिवाळीपूर्वीच सोने-चांदीने आनंदवार्ता आणली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला सोन्यात घसरण झाली. पण चांदीने दरवाढीचे सत्र सुरुच ठेवले. आता चांदीतही मोठी पडझड झाली आहे. ग्राहकांसाठी हा सुखद धक्का आहे. गृहिणींची हौस तर भागणारच आहे, पण त्यासाठी जादा दामही मोजावे लागणार नाही.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीचा सुखद धक्का, सराफा बाजारात गोडवा वाढला
| Updated on: Nov 08, 2023 | 8:26 AM
Share

नवी दिल्ली | 8 नोव्हेंबर 2023 : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच ग्राहकांना सोन्याने दिलासा दिला आहे. चांदीने मात्र हिरमोड केला होता. या आठवड्यात सोन्याने माघार घेतली तर चांदीची आगेकूच सुरु होती. भाव घसरल्याने दिवाळी गोड होणार आहे. अनेक महिन्यांचा रतीब बाजूला सारत सोने-चांदीने ऑक्टोबर महिन्यात 4 हजारांची मसबदारी घेतली. या दरवाढीने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. दिवाळीत सोने-चांदीच्या स्वस्ताईवर पाणी फेरले. मंगळवारी सोन्यासह चांदीने (Gold Silver Price Today 8 November 2023) पण आनंदवार्ता दिली. दोन्ही मौल्यवान धातूत घसरण झाली. धनत्रयोदशीपूर्वी ही घसरण कायम राहिल्यास ग्राहकांच्या खिशावर ताण येणार नाही. असा सोने-चांदीचा भाव..

1500 रुपयांनी सोने स्वस्त

गेल्या दहा दिवसांत सोन्यात घसरणीचे सत्र आहे. 1500 रुपयांनी सोने स्वस्त झाले. या आठवड्यात 250 रुपयांची घसरण झाली. यापूर्वी 4 नोव्हेंबर रोजी सोने 110 रुपयांनी उतरले. 5 नोव्हेंबरमध्ये बदल झाला नाही. तर 6 नोव्हेंबर रोजी 150 रुपयांनी भाव उतरले. 7 नोव्हेंबर रोजी 100 रुपयांची घसरण झाली. आता 22 कॅरेट सोने 56,400 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,510 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीने घेतली माघार

चांदीत गेल्या महिन्यात घसरण झाली. पण गेल्या आठवड्यात 2 नोव्हेंबर रोजी चांदीने 700 रुपयांची उसळी घेतली आणि नंतर तेवढीच घसरण झाली. 4 नोव्हेंबर रोजी त्यात 900 रुपयांची वाढ झाली. 6 नोव्हेंबर रोजी चांदी 200 रुपयांनी महागली. 7 नोव्हेंबर रोजी किंमतीत 700 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 74,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 60,579 रुपये, 23 कॅरेट 60,336 रुपये, 22 कॅरेट सोने 55,490 रुपये झाले. 18 कॅरेट 45,434 रुपये, 14 कॅरेट सोने 35,439 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदी घसरली. एक किलो चांदीचा भाव 70,705 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

Follow Us
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली
राज ठाकरेंची ही ॲक्शन पहाच; नेमका कुणावर साधला निशाणा?
Raj Thackeray UNCUT Speech | राज ठाकरेंची ही ॲक्शन पहाच; नेमका कुणावर साधला निशाणा?
मला भीती वाटते की... राज ठाकरे भाषणामध्येच असं का म्हणाले? यंदा गणपतीत
मला भीती वाटते की... राज ठाकरे भाषणामध्येच असं का म्हणाले? यंदा गणपतीत मोठ्या...
तो कोण कुरळ्या केसांचा बाबा... राज ठाकरेंनी रावणाचा किस्सा सांगताच...
तो कोण कुरळ्या केसांचा बाबा... राज ठाकरेंनी किस्सा सांगिताच हशा पिकला, मेळाव्यातील लोकं...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं पु्न्हा मोठं विधान; थेट म्हणाले...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं पु्न्हा मोठं विधान; थेट म्हणाले, न्यायप्रक्रियेतील गती...
भाजपऐवजी चक्क काँग्रेसचा उल्लेख; भरमंचावर भाजप खासदाराचे वक्तव्य चुकलं
भाजपऐवजी चक्क काँग्रेसचा उल्लेख; भरमंचावर भाजप खासदाराचे वक्तव्य चुकलं, स्वतःच्याच मुलाला...
विद्यानंद बापट यांच्यावरील हल्लाबाबत सुळेंची सर्वात मोठी प्रतिक्रिया;
Supriya Sule | विद्यानंद बापट यांच्यावरील हल्लाबाबत सुळेंची सर्वात मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाल्या...
सरकार पडल्यानंतर सर्वात आधी हा नेताच पक्ष सोडणार; बड्या नेत्याच्या...
सरकार पडल्यानंतर सर्वात आधी हा नेताच पक्ष सोडणार; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
जरांगेंच्या उपोषणाचा आज नववा दिवस; तब्येत आणखी खालावली, मात्र...
Manoj Jarange Patil | जरांगेंच्या उपोषणाचा आज नववा दिवस; तब्येत आणखी खालावली, मात्र...
बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्याचा सत्कार; चांदीचे कडं देऊन...
बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्याचा सत्कार; चांदीचे कडं देऊन... संग्राम भंडारेंनी केली अजब घोषणा