Gold Price Today | सोनं कितीने महागलं? जाणून घ्या तुमच्या शहरातले दर

Nupur Chilkulwar

|

Updated on: Jan 09, 2021 | 12:21 PM

मुंबईत आज सोन्याचा दर 50,830 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचला. कालपेक्षा सोन्याच्या भावात आज 118 रुपयांची वाढ झाली.

Gold Price Today | सोनं कितीने महागलं? जाणून घ्या तुमच्या शहरातले दर
Gold Silver Price Today

Follow us on

मुंबई : कोरोनामुळे सोन्याच्या भावात गेल्या वर्षात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाला (Gold Silver Price Today). त्याशिवाय, नववर्षाच्या सुरुवातीला सोन्याच्या भावात काहीशी घसरण पाहायला मिळाली. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा सराफा बाजारात सोने आणि चांदीला झळाळी मिळाली. मुंबईत आज सोन्याचा दर 50,830 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचला. कालपेक्षा सोन्याच्या भावात आज 118 रुपयांची वाढ झाली. पण, दोन दिवसांपूर्वी सोन्याचा भाव 51,050 प्रति तोळ्यावर पोहोचला होता (Gold Silver Price Today).

तर, चांदीच्या भावात घसरण झाली आहे. चांदीचा आजचा भाव 63 हजार 900 रुपये प्रति किलो आहे. काल चांदी 69 हजार 900 रुपये प्रति किलोवर होती. म्हणजेच चांदीच्या भावात तब्बल 6 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

कुठल्या शहरात सोन्याचा आजचा भाव?

मुंबई –

सोने – 50,830 रुपये प्रति तोळा

चांदी – 63,900 रुपये प्रति किलो

पुणे –

सोने – 50,830 रुपये प्रति तोळा

चांदी – 63,900 रुपये प्रति किलो

जळगाव –

सोने – 50,316 प्रति तोळा

चांदी – 65,462 प्रति किलो

नागपूर –

सोने – 50,830 रुपये प्रति तोळा

चांदी – 63,900 रुपये प्रति किलो

नाशिक –

सोने – 50,830 रुपये प्रति तोळा

चांदी – 63,900 रुपये प्रति किलो

या आठवड्यात सोने-चांदीच्या भावात चढ-उतार (मुंबई)

8 जानेवारी

सोने – 50, 820 रुपये प्रति तोळा

चांदी – 69,900 रुपये प्रति किलो

7 जानेवारी

सोने – 51,050 रुपये प्रति तोळा

चांदी – 69,700 रुपये प्रति किलो

6 जानेवारी

सोने – 51, 350 रुपये प्रति तोळा

चांदी – 71,400 रुपये प्रति किलो

5 जानेवारी

सोने – 50, 230 रुपये प्रति तोळा

चांदी – 70,200 रुपये प्रति किलो

4 जानेवारी

सोने – 50,220 रुपये प्रति तोळा

चांदी – 70,300 रुपये प्रति किलो

3 जानेवारी

सोने – 50,060 रुपये प्रति तोळा

चांदी – 68,120 रुपये प्रति किलो

2 जानेवारी

सोने – 50,050 रुपये प्रति तोळा

चांदी – 68,130 रुपये प्रति किलो

1 जानेवारी

सोने – 49,940 रुपये प्रति तोळा

चांदी – 68,100 रुपये प्रति किलो

Gold Silver Price Today

लग्नसराईमुळे सोन्याच्या भावात चढउतार

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच बाजारात सोने आणि चांदीची चमक कमी झाल्याचे दिसून येत आहे. सध्या लग्नसराई सुरु असून, सोन्या चांदीला मागणी चांगली आहे. गेल्या 18 ते 20 दिवसांपासून दररोज सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Price)चढ-उतार सुरु असल्याचे दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने-चांदीच्या गुंतवणुकीबाबत संभ्रम असल्याने सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Gold Silver Price Today

संबंधित बातम्या :

Gold-Silver Latest price: नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच सोने-चांदीच्या दरात घट, आजचे भाव…

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI