AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold/Silver Price Today: सोन्याची किंमत विक्रमी स्तरापेक्षा अजूनही 9000 रुपयांनी स्वस्त, पटापट तपासा नवे दर

मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर ऑक्टोबर वायदा सोने 0.03 टक्क्यांच्या कमकुवततेसह व्यवहार करीत आहे. मात्र, चांदीचे भाव वाढत आहेत. सप्टेंबर फ्युचर्स चांदी 0.24 टक्क्यांच्या उच्चांकासह व्यापार करीत आहे.

Gold/Silver Price Today: सोन्याची किंमत विक्रमी स्तरापेक्षा अजूनही 9000 रुपयांनी स्वस्त, पटापट तपासा नवे दर
संग्रहित छायाचित्र
| Edited By: Vaibhav Desai | Updated on: Aug 17, 2021 | 12:12 PM
Share

नवी दिल्लीः Gold/Silver Price Today: भारतीय वायदे बाजारात आज सोन्याच्या किमतीत किंचित घट झाली. मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर ऑक्टोबर वायदा सोने 0.03 टक्क्यांच्या कमकुवततेसह व्यवहार करीत आहे. मात्र, चांदीचे भाव वाढत आहेत. सप्टेंबर फ्युचर्स चांदी 0.24 टक्क्यांच्या उच्चांकासह व्यापार करीत आहे. गेल्या व्यापार सत्रात अस्थिर व्यापारात सोने 0.47 टक्क्यांनी वाढले होते, तर चांदीने 0.54 टक्क्यांची वाढ नोंदवली होती.

सोन्याची किंमत 45,600 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या चार महिन्यांच्या नीचांकावर

गेल्या आठवड्यात सोन्याची किंमत 45,600 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या चार महिन्यांच्या नीचांकावर आली होती. यानंतर सोन्यात थोडी सुधारणा झाली आणि किंमत आता 10 हजार रुपये प्रति 47,000 पार केली आहे. गेल्या वर्षी सोन्याची किंमत 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या विक्रमी पातळीवर पोहोचली.

सोने आणि चांदीची नवी किंमत (Gold/Silver Price on 17 August 2021)

मंगळवारी एमसीएक्सवरील ऑक्टोबर फ्युचर्स सोन्याचे भाव 13 रुपयांनी कमी होऊन 47,212 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. MCX वर सप्टेंबर चांदीच्या वायदाची किंमत 153 रुपयांनी वाढून 63,610 रुपये प्रति किलो झाली.

सोन्यात मोठी घसरण होण्याचा अंदाज

सोन्याच्या गुंतवणूकदारांना यूबीएस ग्रुपने इशारा दिलाय. ते म्हणतात की, कोरोनानंतर आर्थिक सुधारणेला गती मिळत आहे. यूएस जॉब मार्केट डेटा अपेक्षेपेक्षा चांगला बाहेर आलाय. अशा परिस्थितीत फेडरल रिझर्व्ह वेळापूर्वी व्याज वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते. यूबीएस समूहाच्या कमोडिटी मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही रणनीतिक स्थितीत असाल तर या गुंतवणुकीतून बाहेर पडा. जर तुम्ही रणनीतिकदृष्ट्या गुंतवणूक केली असेल तर हेजिंग करा. यूबीएस समूहाचा अंदाज आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1600 डॉलर आणि चांदी 22 डॉलरच्या पातळीवर येऊ शकते. याउलट गोल्डमन सॅक्स म्हणतो की, सोने पुन्हा 2000 डॉलरच्या पातळीवर पोहोचेल.

सराफा बाजारातील सोने-चांदीची किंमत

सोमवारी सोन्यात किंचित घट झाली, तर चांदी 505 रुपयांनी घसरली. सोने 42 रुपयांनी घटून 45,960 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​बंद झाले. आजही घसरल्यानंतर चांदी 61,469 रुपये प्रति किलोवर बंद झाली.

संबंधित बातम्या

पोस्टाच्या ‘या’ योजनेतून मॅच्युरिटीपूर्वी कधीही पैसे काढू नका, 48% व्याजाचं नुकसान

Provident Fund मधून पैसे काढताना ही चूक करू नका, 1 लाख काढले तर 11 लाखांचे नुकसान

Gold / Silver Price Today: Gold still Rs 9000 cheaper than record level, check for new rates

Follow Us
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले, लहान मतदारसंघांसाठी...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले, मला मार्गदर्शनाची...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण समोर
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावले...
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावलेल्या मुलाची विचारपूस
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या..
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या मार्ग
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; बैठकीत कोणत्या...
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद, VIDEO व्हायरल
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने..
Pune Case : पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने रद्द!
विलिनीकरणाचा एक-दोन दिवसात 'द एंड' होईल, राऊतांचा दावा; नेमकं काय..
Sanjay Raut On NCP Merger : विलिनीकरणाचा एक-दोन दिवसात 'द एंड' होईल, राऊतांचा दावा; असं काय म्हणाले?
भोसरीत मतदार यादीचा घोळ? तब्बल 15 हजार मतदारांची नावे दुसरीकडे शिफ्ट,
भोसरीत मतदार यादीचा घोळ? तब्बल 15 हजार मतदारांची नावे दुसरीकडे शिफ्ट, अजित गव्हाणेंचा गंभीर आरोप!