Gold Price Today | सोन्याच्या किंमती पुन्हा वधारल्या! जाणून घ्या 10 ग्रॅमचा आजचा भाव…

गेल्या कित्येक दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत (Gold Price) वारंवार चढ-उतार होताना दिसत आहेत. सोमवारी (26 एप्रिल) वायदा व्यापारात सोन्याच्या किंमती पुन्हा एकदा वधारल्या आहेत.

Gold Price Today | सोन्याच्या किंमती पुन्हा वधारल्या! जाणून घ्या 10 ग्रॅमचा आजचा भाव...
सोन्या-चांदीच्या किंमती
Follow us
| Updated on: Apr 26, 2021 | 12:44 PM

मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत (Gold Price) वारंवार चढ-उतार होताना दिसत आहेत. सोमवारी (26 एप्रिल) वायदा व्यापारात सोन्याच्या किंमती पुन्हा एकदा वधारल्या आहेत. त्यात 72 रुपयांची वाढ झाली. सोमवारी सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) जून वायदा सोन्याचा भाव 10 ग्रॅम 47604 रुपयांवर उघडला. या आधीच्या ट्रेडमध्ये वायदा व्यापारात सोन्याचा दर 10 ग्रॅम 47532 रुपयांवर बंद झाला होता (Gold Silver Price Today on 26 April 2021 MCX rates).

तज्ज्ञांच्या मते गुंतवणूकदारांच्या आत्मविश्वासामुळे सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. गुंतवणूकदारांना असा विश्वास आहे की, सोन्यातील गुंतवणूकीसाठी हीच योग्य वेळ आहे. भविष्यात लोकांच्या गरजेनुसार हे उपयोगी ठरू शकते. याचा त्यांना फायदा होईल.

चांदीचे वायदेही तेजीत

चांदीच्या वायदा (Silver Price) भावमध्ये देखील सोन्यासारखी तेजी दिसून येत आहे. सोमवारी, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) मे चांदीचा वायदा भाव 412 रुपयांनी वाढून 69086 रुपये प्रतिकिलोवर गेला होता. आदल्या संध्याकाळी चांदीच्या वायद्याचे भाव 68674 रुपये प्रति किलोवर झाले होते. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास एमसीएक्सवर चांदीची किंमत  68575 रुपये प्रतिकिलो होती.

गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत घसरण

गेल्या आठवड्यात शुक्रवारी, दिल्ली सराफा बाजारातील सोन्याचे मूल्य 24 रुपयांनी खाली आले होते. सोन्याच्या किंमतीत घट झाल्यानंतर सोन्याची स्पॉट किंमत प्रति 10 ग्रॅम 47273 रुपयांच्या पातळीवर पोहोचली होती. मागील सत्रात सोन्याचा दर 47297 प्रति 10 ग्रॅम रुपयांच्या पातळीवर बंद झाला होता. शुक्रवारी चांदीच्या दरातही 909 रुपयांची घसरण दिसून आली. मागील सत्रात चांदी 68971 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली होती (Gold Silver Price Today on 26 April 2021 MCX rates).

या महिन्यात 4 हजारांनी महागले सोने

या महिन्यात भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किंमतीत 4 हजार रुपयांपेक्षाही जास्त वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठेतील रिकव्हरीमुळे सोन्याला झळाळी मिळाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीस, अमेरिकन बॉन्ड यील्ड्समध्ये तेजीमुळे सोने 44000 त्या स्तरावर पोहचले होते. ज्यामुळे सेप-हेवन एसेटला धक्का बसला होता.

परंतु, अमेरिकन बाँड यील्ड्सच्या मंदीसोबतच अमेरिकन डॉलरही घसरल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात आज अमेरिकन डॉलरच्या किंमतीत मंदीमुळे आणि यूएस ट्रेझरी यिल्ड्समध्ये घसरण झाल्यामुळे सोने 1,800 डॉलरच्या पातळीवर पोहोचले.

स्पॉट गोल्ड 1,797.67 डॉलर दोन महिन्यांच्या उच्चांक पातळी गाठल्यानंतर 1,793.32 डॉलर प्रति औंसवर स्थिर होते. दोन दिवसानंतर युरोपियन मध्यवर्ती बँकेच्या बैठकीचे निकाल लागण्याची प्रतीक्षा सोन्याचे व्यापारी करत आहेत. त्याचबरोबर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह पॉलिसीची बैठकही पुढच्या आठवड्यात होणार आहे.

(Gold Silver Price Today on 26 April 2021 MCX rates)

हेही वाचा :

सोन्यात गुंतवणूक करणार असाल तर हे 3 पर्याय येतील कामी; दुप्पट फायदा मिळणार

Gold price today: सोने पुन्हा एकदा झालं स्वस्त, पटापट जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.