Gold Silver price Update : सोन्याचा भाव उतरला, चांदीही घसरली; जाणून घ्या दर…

शेअर बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर आज (शुक्रवार) सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली.

Gold Silver price Update : सोन्याचा भाव उतरला, चांदीही घसरली; जाणून घ्या दर...

नवी दिल्ली : शेअर बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर आज (शुक्रवार) सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली. दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याचा भाव 614 रुपयांनी कमी होऊन 10 ग्रॅम सोन्यासाठी 49 हजार 763 रुपयांवर बंद झाला. कालही (गुरुवारी) सोन्याच्या किंमतीत घसरण झाली होती. गुरुवारी  सोने 714 रुपयांनी स्वस्त झाले होते. गुरुवारी प्रति 10 ग्रॅम सोन्यासाठी 50 हजार 335 रुपये इतका भाव होता. (Gold Silver price Update Today 8 January latest Rate)

सराफा बाजारात आज चांदीच्या दरातही 1609 रुपयांची जोरदार घसरण झाली आहे. चांदीचा प्रति किलोचा भाव आज (शुक्रवार) 67 हजार 518 रुपये इतका होता. गुरुवारीही चांदीच्या भावात 386 रुपयांची घसरण झाली होती. सोन्या चांदीच्या दरातील घसरणीवर बोलताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितलं की, “डॉलरच्या वाढीमुळे सोन्या-चांदीच्या किंमती खाली आल्या आहेत.”

सोन्याचे डिलिव्हरीमध्ये मोठी घसरण

सराफा बाजारातील सोन्याची घसरण झाल्याने आज MCX डिलिव्हरीवरील सोन्याचे भावही घसरलेले दिसले. शुक्रवारी सायंकाळी 6.10 वाजता, फेब्रुवारी डिलीव्हरीसाठी सोन्याचा भाव 732 रुपयांनी घसरुन तो 50 हजार 172 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

चांदीच्या दरातही घसरण

मार्च डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव एमसीएक्सवर 1558 रुपयांनी घसरुन तो प्रतिकिलो 68 हजार 404 रुपये इतका झाला. त्याचप्रमाणे मे डिलिव्हरीसाठी चांदीची घसरण 1272 रुपयांनी होऊन चांदी आज प्रतिकिलो 69708 रुपये इतकी आहे.

मुंबईतील सोन्याचे दर(Gold Price in Mumbai)

मुंबईमधील सोन्याच्या दरामध्ये फारसा फरक झालेला नाही. आज मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 50 हजार 60 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51 हजार 60 इतका आहे. गुरुवार (7 जानेवारी) च्या तुलनेत आज प्रति 10 ग्रॅममध्ये रुपयांची वाढ झाली आहे. आठ दिवसांमध्ये मुंबईतील सोन्याच्या दरामध्ये प्रति 10 ग्रॅम 1120 रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळाली.

पुण्यातील सोन्याचे दर(Gold Price in Pune)

मुंबईमधील आणि पुण्यामधील सोन्याच्या दर सारखेच दिसून आले. आज पुण्यामध्ये 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 50 हजार 60 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51 हजार 60 इतका आहे. गुरुवार (7 जानेवारी) च्या तुलनेत आज प्रति 10 ग्रॅममध्ये रुपयांची वाढ झाली आहे. आठ दिवसांमध्ये मुंबईतील सोन्याच्या दरामध्ये प्रति 10 ग्रॅम 1120 रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळाली.

(Gold Silver price Update Today 8 January latest Rate)

Fact Check : 10 लाखांहून अधिक किमतीच्या दागिने खरेदीवर KYC करणे खरचं गरजेचे, सत्य काय?

Gold Silver Price today : सोने आणि चांदीच्या दरात किंचित वाढ; जाणून घ्या आजचा दर

Gold Rate | गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सोन्याचे दर पुन्हा घसरले

Published On - 10:33 pm, Fri, 8 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI