AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate : सोनं तब्बल 7000 रुपयांनी आपटलं, चांदीचा भाव तर…युद्धामध्ये भाव नेमका का घसरतोय? वाचा…

युद्धामध्ये सोन्याचा भाव वाढतो. परंतु यावेळी सोने आणि चांदी स्वस्त झाले आहे. चांदीचा भाव चक्क 14 हजार रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे हे का झाले असावे असे विचारले जात आहे.

Gold Rate : सोनं तब्बल 7000 रुपयांनी आपटलं, चांदीचा भाव तर...युद्धामध्ये भाव नेमका का घसरतोय? वाचा...
gold and silver rate todayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 15, 2026 | 8:45 PM
Share

Gold Silver Rate : जगात कुठे युद्धाला सुरुवात झाली किंवा भू-राजकीय तणाव निर्माण झाला लोक सुरक्षित गुंतवणुकीकडे वळतात. परिणामी सोने आणि चांदी यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायांचा भाव वाढतो. सध्या इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध भडकलेले आहे. त्यामुळे या नियमाप्रमाणे सोने आणि चांदीचा भाव वाढेल, असे गृहित धरले जात होते. परंतु प्रत्यक्षात मात्र वेळेच चित्र समोर आले आहे. युद्धाला सुरुवात झाली तेव्हापासून सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत घसरण झाली आहे. म्हणजेच सोने आणि चांदी स्वस्त झालेले आहे. असे नेमके का झाले असावे? हे जाणून घेऊ या..

युद्धाला सुरुवात झाली तेव्हापासून कमोडिटी बाजारात सोन्याचा तसेच चांदीचा भाव घसरला आहे. चांदीचा भाव तर 14 हजार रुपयांपर्यंत कमी झालेला आहे. म्हणजेच चांदीचा भाव साधारण 5 टक्क्यांनी कमी झाला आहे. सोन्याबाबत बोलायचे झाल्यास 28 फेब्रुवारी रोजी एमसीएक्सवर सोन्याचा भाव 1 लाख 69 हजार 880 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. हाच भआव 13 मार्च रोजी 1 लाख 59 हजार 350 रुपयापर्यंत घसरला होता. 15 मार्च रोजी सोन्याचा भाव 1 लाख 62 हजार रुपये आहे. म्हणजेच सोन्याच भावही 7,880 रुपयांनी घसरला आहे.

सोनं स्वस्त का होत आहे?

तज्ज्ञांच्या मतानुसार युद्ध सुरू झाल्यानंतर जागतिक पातळीवर अनिश्चितता निर्माण होते. त्यामुळे आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीचा पार्याय निवडतात. त्यामुळे सोने, चांदीचा भाव वाढतो. परंतु यावेळी सोन्याचा भाव घसरला आहे. दुसरीकडे युद्धामुळे अनिश्चितता निर्माण झाल्याने कधी सोन्याचा भाव वाढतो तर कधी कमी होतो. त्यामुळे आपले नुकसान टाळण्यासाठी काही गुंतवणूकदार सोन्यात गुंतवलेले पैसे काढूनही घेतात. त्यामुळेही विक्रीचा दबाव वाढल्याने सोने आणि चांदीचा भाव कमी झाला असावा, असा अंदाज लावला जातोय.

अमेरिकन डॉलर मजबूत त्यामुळेही…

युद्धाच्या काळात अमेरिकन डॉलरची स्थिती मजबूत झालेली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार अमेरिकन डॉलर किंवा अमेरिकन ट्रेझरी यांच्यात गुंतवणुकीचा पर्याय निवडतात. त्यामुळे सोने आणि चांदीचा भाव कमी झालेला असावा, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Follow Us
खरात प्रकरणात नवे धागेदोरे समोर; चाकणकर शिर्डी पोलिसांच्या रडारवर
खरात प्रकरणात नवे धागेदोरे समोर; चाकणकर शिर्डी पोलिसांच्या रडारवर.
एकनाथ शिंदें ऐवजी सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होणार? राऊतांचं विधान काय?
एकनाथ शिंदें ऐवजी सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होणार? राऊतांचं विधान काय?.
शरद पवारांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का?; राऊतांचे विधान चर्चेत
शरद पवारांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का?; राऊतांचे विधान चर्चेत.
जळगावात धक्कादायक प्रकार! KYCच्या बहाण्याने महिलेाकडे शरीरसुखाची मागणी
जळगावात धक्कादायक प्रकार! KYCच्या बहाण्याने महिलेाकडे शरीरसुखाची मागणी.
आशा भोसलेंचं निधन, शिवाजी पार्कातील स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
आशा भोसलेंचं निधन, शिवाजी पार्कातील स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार.
संगीत क्षेत्रातल्या युगाचा अस्त, आशा भोसलेंचं 92 व्या वर्षी निधन
संगीत क्षेत्रातल्या युगाचा अस्त, आशा भोसलेंचं 92 व्या वर्षी निधन.
ई केवायसीच्या नावाखाली महिलेकडून शरीर सुखाची मागणी, जळगावातील घटनेने ख
ई केवायसीच्या नावाखाली महिलेकडून शरीर सुखाची मागणी, जळगावातील घटनेने ख.
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील 18 तास काही भागातील पाणी पुरवठा बंद
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील 18 तास काही भागातील पाणी पुरवठा बंद.
आढावा बैठकीत शेजारी बसूनही शिरसाट, सत्तारांचा अबोला, भर मंचावर...
आढावा बैठकीत शेजारी बसूनही शिरसाट, सत्तारांचा अबोला, भर मंचावर....
एका युगाचा अंत! अजरामर गीतांना स्वर देणाऱ्या आशाताईंचा अल्पपरिचय
एका युगाचा अंत! अजरामर गीतांना स्वर देणाऱ्या आशाताईंचा अल्पपरिचय.