AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi : वैभव मुंबई इंडियन्सकडून खेळू शकतो, दिग्गज क्रिकेटरने राजस्थानला कटू सत्याची जाणीव करुन दिली

Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी हे यंदाच्या आयपीएलमधील गाजणारं नाव आहे. पहिला चेंडू असो वा शेवटचा वैभव सूर्यवंशीचा पवित्रा तोच असतो. आता पुढच्या ऑक्शनमध्ये वैभव सूर्यवंशीला किती भाव मिळेल? किती मोठा रेकॉर्ड मोडला जाईल? या बद्दल जाणून घ्या.

Vaibhav Sooryavanshi : वैभव मुंबई इंडियन्सकडून खेळू शकतो, दिग्गज क्रिकेटरने राजस्थानला कटू सत्याची जाणीव करुन दिली
Akash Ambani-Vaibhav SooryavanshiImage Credit source: PTI
| Updated on: Apr 30, 2026 | 3:43 PM
Share

सध्या क्रिकेट विश्वात एकाच नावाची चर्चा आहे ते म्हणजे वैभव सूर्यवंशी. त्याच्या वयाचा विचार करता फार कमी क्रीडापटूंना असं भाग्य लाभतं. सचिन तेंडुलकरच्या बाबतीत असा दुर्मिळ योग जुळून आलेला. अगदी आयपीएलच्या पहिल्या सामन्यापासून वैभव सूर्यवंशी हे नाव चर्चेत आहे. वैभव सूर्यवंशी टॅलेंटेड आहे यात शंका नाही. आज घराघरात या 15 वर्षाच्या मुलाची चर्चा आहे. प्रत्येक सामन्यात तो शतक, अर्धशतक झळकवत नाही. पण टीमला जी सुरुवात देतो, त्यातून त्याची प्रतिभा दिसून येते. या वैभवमुळे राजस्थान रॉयल्स टीमची या आयपीएलमध्ये जास्त चर्चा आहे. वैभवने यंदाच्या सीजनमध्ये अनेक सामन्यात राजस्थानच्या विजयाचा पाया रचला. राजस्थान रॉयल्सला आयपीएलच्या उद्घाटनाच्या पहिल्या सीजनमध्ये विजेतेपद मिळालं होतं.

त्यानंतर या टीमला पुन्हा विजेतेपद मिळालं नाही. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सारखा चाहतावर्ग या टीमला लाभला नव्हता. संजू सॅमसन आणि जोस बटलर सारख्या प्लेयर्समुळे राजस्थान रॉयल्सची चर्चा व्हायची. पण आता वैभव सूर्यवंशीने स्वत:साठी आणि या टीमसाठी अभूतपूर्व लोकप्रियता खेचून आणली आहे. आयपीएल 2024 च्या मेगा ऑक्शनमध्ये राजस्थान रॉयल्सने सूर्यवंशीला 1.1 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं होतं. त्या गुंतवणूकीवर टीमला आता डिविडंड मिळतोय.

पुढच्या ऑक्शनमध्ये वैभव सूर्यवंशीवर किती कोटीची बोली लागेल?

समजा, जर पुन्हा ऑक्शन झालं, तर वैभव सूर्यवंशी हेडलाइन बनलेला असेल. तो आतापर्यंतच्या आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडूच ठरणार नाही, तर 30 कोटीच्या पलीकडे भाव मिळवणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरु शकतो. राजस्थान रॉयल्सच्या या पोस्टरबॉयबद्दल इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टूअर्ट ब्रॉडने काही गोष्टींची आठवण करुन दिली आहे. “वैभव सूर्यवंशी हा तुमच्याशी कॉन्ट्रॅक्टने बांधलेला नाही. जेव्हा वेळ येईल, तेव्हा तो अन्य पर्याय शोधेल. यात त्याची क्षमता लक्षात घेतो तो मुंबई इंडियन्सकडून खेळू शकतो”

ते तीन वर्ष वैभवला स्क्वाडमध्ये ठेवणार का?

“ज्यावेळी ऑक्शनमध्ये त्यांनी वैभव सूर्यवंशीला करारबद्ध केलं, तेव्हा तो 14 किंवा 13 वर्षांचा होता. इतक्या लहान वयाच्या मुलाला घेण्याचा निर्णय मला थोडा विचित्र वाटलेला. ते तीन वर्ष वैभवला स्क्वाडमध्ये ठेवणार का? हा मला प्रश्न पडलेला. तुम्ही त्याला 10 वर्षासाठी करारबद्ध केलेलं नाही. ते मुंबई इंडियन्स किंवा दुसऱ्या फ्रेंचायजीकडून खेळू शकतो” असं ब्रॉड इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू जोस बटलरला ‘फॉर द लव्ह ऑफ क्रिकेट’च्या पॉडकास्टमध्ये म्हणाला.

Follow Us
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक CCTV फुटेज समोर!
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,  ठाकरेंच्या नगरसेवकाला... नेमकं प्रकरण काय?
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
Dhiraj Seth | भारतीय लष्कराला नवे सेनाप्रमुख! 40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ; नेमकं काय सांगितलं?