AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोन्याने आणले आनंदाचे भरते, जाणून घ्या 10 ग्रॅमचा भाव

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने ग्राहकांना आनंदाचे भरते आणले आहे. किंमतीत मोठी घसरण झाली आहे. 10 ग्रॅमसाठी ग्राहकांना आता इतके रुपये मोजावे लागतील.

Gold Silver Rate Today : सोन्याने आणले आनंदाचे भरते, जाणून घ्या 10 ग्रॅमचा भाव
आनंदी आनंद गडे
| Updated on: Jun 09, 2023 | 9:14 AM
Share

नवी दिल्ली : सोने-चांदीच्या स्वस्ताईने (Gold Silver Rate Today) ग्राहकांना आनंदाचे भरते आणले आहे. किंमतीत मोठी घसरण झाल्याने ग्राहकांचे पाय आपसूकच सराफा बाजाराकडे वळले आहे. गेल्या मे महिन्यापासून सोने-चांदीला कोणताही नवीन रेकॉर्ड करता आलेले नाही. सोन्याची आगेकूच थांबल्याने आणि चांदीतील घसरणीमुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यात सोने-चांदीच्या जोरदार घौडदौडीने ग्राहकांचे तोंडचे पाणी पळाले होते. दरवाढीचा या दोन मौल्यवान धातूंच्या विक्रीवर मोठा परिणाम दिसून आला. विक्रीत घसरण दिसून आली होती. सध्या भाव 60,000 रुपयांच्या आत आल्याने त्यांच्या आनंदाला उधाण आले आहे.

चौथ्या दिवशी काय स्थिती या आठवड्याच्या चौथ्या दिवशी म्हणजे गुरुवारी सोने 441 रुपये प्रति 10 ग्रॅमने घसरले. 8 जून रोजी सोने स्वस्त होऊन 59587 रुपयांवर स्थिरावले. तर बुधवारी (Gold Price) 68 रुपये प्रति 10 ग्रॅमने सोने स्वस्त होऊन 60028 रुपयांवर बंद झाले. गुरुवारी चांदीत तेजी दिसून आली. चांदीचा भाव वधारला. चांदी 175 रुपयांनी महागली. हा भाव 71999 रुपये किलोवर पोहचला. बुधवारी चांदी 80 रुपयांनी स्वस्त होऊन 71824 रुपये प्रति किलोवर बंद झाली.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव गुरुवारी 24 कॅरेट सोने स्वस्त होऊन 59587 रुपये, 23 कॅरेट 59348 रुपये, 22 कॅरेट सोने 54582 रुपये, 18 कॅरेट 44690 रुपये आणि 14 कॅरेट सोने 34858 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. ibjarates च्या भावानुसार हे दर आहेत.

8 दिवसांतील बदल

  1. goodreturns नुसार, 1 जून रोजी सोन्यात 150 रुपयांची घसरण झाली होती.
  2. 22 कॅरेट सोने 55,850 रुपये तर 10 ग्रॅम 24 कॅरेटचा भाव 60,930 रुपये पोहचला.
  3. 2 जून रोजी सोन्याने मुसंडी मारली. सोने 300 रुपये प्रति 10 ग्रॅमने वधारले
  4. 3 जून रोजी सोन्यात मोठी पडझड झाली. सोने 700 रुपयांनी आपटले
  5. 4, 5 जून रोजी भावात मोठा बदल झाला नाही
  6. 6 जून रोजी भावात प्रति 10 ग्रॅम 300 दरवाढ झाली
  7. 7 जून रोजी भावात मोठा बदल झाला नाही
  8. 8 जून रोजी सोन्यात 400 रुपयांची घसरण झाली, भाव 60,370 रुपयांवर स्थिरावला

भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच