AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 10 August 2024 : सोने-चांदीचा ग्राहकांना चकवा; आठवड्याच्या अखेरीस भावात तेजी, आजचा दर किती?

Gold Silver Rate Today 10 August 2024 : तर या आठवड्यातील मरगळ अखेर सोने आणि चांदीने झटकली. ग्राहकांना खरेदीसाठी आठवड्याच्या अखेरीस वेळ मिळतो, ऐन त्याचवेळी मौल्यवान धातूच्या किंमतीत मोठी वाढ झाली. ग्राहकांना फटका बसला.

Gold Silver Rate Today 10 August 2024 : सोने-चांदीचा ग्राहकांना चकवा; आठवड्याच्या अखेरीस भावात तेजी, आजचा दर किती?
सोने चांदी महाग
| Updated on: Aug 10, 2024 | 8:29 AM
Share

सोने आणि चांदीने ग्राहकांना आठवड्याच्या अखेरीस झटका बसला. सोन्याने गोल्डन भरारी घेतली. तर चांदी महागली. या आठवड्यात दोन्ही धातूत नरमाई होती. सलग चार दिवस पडझडीनंतर मौल्यवान धातूंनी उसळी घेतली. ग्राहकांची सराफा बाजारात वर्दळ वाढत असतानाच या धातूंनी ग्राहकांचा खिसा कापला. या आठवड्याच्या अखेरीस बेशकिंमती धातूच्या किंमती वधारल्या. सोन्याने मोठी भरारी घेतली आणि पाठोपाठा चांदीने पण मुसंडी मारली. आता काय आहेत भाव? (Gold Silver Price Today 10 August 2024 )

सोन्याची 800 रुपयांची भरारी

या आठवड्यात सोन्यात नरमाईचे सत्र होते. सोने 1300 रुपयांनी उतरले. सोमवारी सोने किंचित उतरले. 6 ऑगस्टला 870 रुपयांनी सोने स्वस्त झाले. 7 ऑगस्टला 440 रुपयांनी किंमती उतरल्या. तर 8 ऑगस्टला भाव जैसे थे होते. 9 ऑगस्ट रोजी सोन्याने 820 रुपयांची मुसंडी मारली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 64,400 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 70,024 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी 1500 रुपयांनी वधारली

या आठवड्यात चांदी 4200 रुपयांनी स्वस्त झाली होती. अखेरच्या सत्रात त्यात 1500 रुपयांची वाढ झाली. 5 ऑगस्टाला चांदी 200 रुपयांनी महागली. 6 ऑगस्ट रोची चांदीत 3200 रुपयांची पडझड झाली. त्यानंतर गुरुवारपर्यंत त्यात 1 हजारांची घसरण झाली. 9 ऑगस्ट रोजी शुक्रवारी किंमती 1500 रुपयांनी वधारल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 83,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 69663, 23 कॅरेट 69,384, 22 कॅरेट सोने 63,811 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 52,247 रुपये, 14 कॅरेट सोने 40,753 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उतरले आहे. एक किलो चांदीचा भाव 80,263 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?