Gold Silver Rate Today 10 July 2024 : गुडन्यूज, सोने-चांदीत आली स्वस्ताई, दरवाढीचा उतरला तोरा, आता भाव आहे असा

Gold Silver Rate Today 10 July 2024 : जुलै महिन्यातील पहिली आनंदवार्ता येऊन धडकली. सोने आणि चांदीच्या आघाडीवर ग्राहकांना गुडन्यूज मिळाली. सोन्यात चढउताराचे सत्र असताना चांदीने मुसंडी मारली होती. आता दोन्ही धातूत घसरण झाली.

Gold Silver Rate Today 10 July 2024 : गुडन्यूज, सोने-चांदीत आली स्वस्ताई, दरवाढीचा उतरला तोरा, आता भाव आहे असा
सोने आणि चांदी वधारली
Follow us
| Updated on: Jul 10, 2024 | 8:38 AM

जुलै महिन्यात सोन्यासह चांदीने तुफान बॅटिंग केली. दरवाढीच्या आघाडीवर चांदीने दमदार घौडदौड केली. सोन्याचा भाव पण वधारला. जुलैचा श्रीगणेशाच दरवाढीने झाल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. अखेर या दरवाढीला जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात ब्रेक लागला. गेल्या आठवड्यात चांदी 5,000 रुपयांनी तर सोने 1500 रुपयांनी वधारले होते. त्यानंतर आता सोन्यासह चांदीत घसरण दिसून आली. काय आहेत मौल्यवान धातूच्या किंमती (Gold Silver Price Today 10 July 2024 )

सोन्यात 500 रुपयांची घसरण

गेल्या आठवड्यात सोन्याने 1500 रुपयांची उसळी घेतली होती. या आठवड्याची सुरुवातच घसरणीने झाली. 8 जुलै रोजी सोने 220 रुपयांनी घसरले. मंगळवारी 9 जुलै रोजी सोने 380 रुपयांनी उतरले. तर आजही सोन्यात सकाळच्या सत्रात घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीचा उतरला तोरा

जुलै महिन्यात चांदीने दरवाढीची मोठी आघाडी उघडली. पहिल्या आठवड्यात चांदी 5,000 रुपयांनी चमकली. या आठवड्याच्या सुरुवातीला 8 जुलै रोजी चांदी 200 रुपयांनी वधारली. तर 9 जुलै रोजी चांदीत 500 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 94,500 रुपये आहे. आज सकाळच्या सत्रात चांदीत घसरणीचे संकेत मिळत आहेत.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने उतरले तर चांदीची घौडदौड सुरु आहे. 24 कॅरेट सोने 72,346 रुपये, 23 कॅरेट 72,056 रुपये, 22 कॅरेट सोने 66,269 रुपये झाले. 18 कॅरेट 54,260 रुपये, 14 कॅरेट सोने 42,322 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 91,847 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.