AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 10 December 2024 : सोन्याने बदलली चाल, इतका वाढला भाव, चांदीची साखर झोप संपेना, किंमत तरी काय?

Gold Silver Rate Today 10 December 2024 : गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरात चढउताराचे सत्र दिसले. सुरुवातीला आणि आठवड्याच्या अखेरीस दोन्ही धातुत नरमाई आली. तर या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याने चाल बदलली तर चांदीची साखर झोप कायम आहे.

Gold Silver Rate Today 10 December 2024 : सोन्याने बदलली चाल, इतका वाढला भाव, चांदीची साखर झोप संपेना, किंमत तरी काय?
सोने आणि चांदी किंमत
| Updated on: Dec 10, 2024 | 8:31 AM
Share

लग्नसराईचा लगबग सुरू असताना सोने आणि चांदीत चढउताराचे सत्र दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात मौल्यवान धातुत चढउताराचे सत्र होते. सुरुवातीला आणि अखरेच्या टप्प्यात ग्राहकांना दिलासा मिळाला. तर गेल्या मंगळवारी आणि गुरुवारी या धातुत तेजीचे सत्र दिसले. या आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याने दरवाढीचा वारू दामटला. तर चांदीची साखर झोप काही संपलेली नाही. जागतिक बाजारात सोन्याचा भाव वधारल्याने त्याचा परिणाम सगळीकडे दिसत आहे. तर चांदीला अजून सूर गवसला नाही. या आता सराफा बाजारात अशा आहेत दोन्ही धातुच्या किंमती (Gold Silver Price Today 10 December 2024 )

सोन्याचा भाव वधारला

या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात वाढ झाली. गेल्या आठवड्यात सोने 900 रुपयांनी उतरले. तर त्यात 540 रुपयांची वाढ झाली होती. तर या सोमवारी 9 डिसेंबर रोजी सोन्यात 160 रुपयांची वाढ दिसली. आज सकाळच्या सुद्धा मौल्यवान धातुत वाढीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,450 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,930 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी सुस्तावली

गेल्या आठवड्यात चांदीत 500 रुपयांची स्वस्ताई आणि नंतर 5 डिसेंबर रोजी चांदी 1 हजारांनी महागली होती. त्यानंतर चांदीच्या किंमतीत मोठा बदल दिसला नाही. या आठवड्याच्या सुरुवातीला सुध्दा या चंदेरी धातुची किंमती जैसे थे होती. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 92,000 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 76,692, 23 कॅरेट 75,385, 22 कॅरेट सोने 70,250 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 57,519 रुपये, 14 कॅरेट सोने 44,865 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 91,800 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...