AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्याजदराचा टोमॅटो आणि डाळीच्या किंमतींशी काय संबंध? केंद्रीय मंत्रीच भडकले RBI वर, Repo Rate मध्ये कपात न केल्याने हल्लाबोल

RBI Repo Rate News : भारतीय रिझर्व्ह बँकेने 11 व्या वेळा रेपो दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला. सातत्याने रेपो दर कायम ठेवून कितीही महागाई असली तरी आम्ही तो वाढवत नसल्याचा संदेश आरबीआय देत आहे. पण सर्वसामान्य नागरिकांना दिलासा हवा आहे. नोकरदार वर्ग महागाई आणि हप्त्यांनी भरडला जात आहे. त्याचीच प्रतिक्रिया या केंद्रीय मंत्र्यांनी दिली आहे.

व्याजदराचा टोमॅटो आणि डाळीच्या किंमतींशी काय संबंध? केंद्रीय मंत्रीच भडकले RBI वर, Repo Rate मध्ये कपात न केल्याने हल्लाबोल
आरबीआय रेपो दर
| Updated on: Dec 08, 2024 | 9:20 AM
Share

भारतीय रिझर्व्ह बँकेने 6 डिसेंबर रोजी पतधोरण समितीच्या बैठकीनंतर रेपो दर कायम ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. 11 व्या वेळा रेप दरात कुठलाही बदल झाला नाही. सातत्याने रेपो दर कायम ठेवून कितीही महागाई असली तरी आम्ही तो वाढवत नसल्याचा संदेश आरबीआय देत आहे. पण सर्वसामान्य नागरिकांना दिलासा हवा आहे. नोकरदार वर्ग महागाई आणि हप्त्यांनी भरडला जात आहे. ही नाराजी व्यक्त करण्याची ताकद सुद्धा मध्यमवर्गीयात उरलेली दिसत नाही. पण या केंद्रीय मंत्र्यांनीच आता आरबीआय विरोधात मोर्चा उघडला आहे.

टोमॅटो-डाळीचा रेपो दराशी काय संबंध?

वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी महागाई आणि व्याजदराबाबत ठोस धोरण जाहीर करण्याची मागणी केली. शनिवारी मुंबईत एका वृत्तवाहिन्याच्या कार्यक्रमात त्यांनी रेपो दराविषयी त्यांचे मत मांडले. त्यांनी आरबीआयच्या धोरणात आपल्याला थेट हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचे सांगीतले. पण टोमॅटो आणि डाळी सारख्या वस्तूंचा व्याजदरावर कसा प्रभाव पडत असेल असा थेट सवाल केला.

भारत आर्थिक बाबतीत आगेकूच करत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.निवडणुकींचे कारण देत दुसर्‍या तिमाहीत जीडीपी घसरल्याचे ते म्हणाले. या 6 डिसेंबर रोजी झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दर 4-2 अशा मताने कायम ठेवण्यात आला. त्यात बदल करण्यात आलेला नाही.

भारतीय अर्थव्यवस्था मजबूत

भारतीय अर्थव्यवस्था शेअर बाजारांप्रमाणे दर तीन महिन्याला बदलत नाही. सर्व व्यापक आकड्यांचा विचार करता अर्थव्यवस्था मजबूत स्थिती असल्याचा दावा गोयल यांनी केला. तिमाही निकालावर अर्थव्यवस्था चालत नाही. या आकड्यांवर नजर टाकली तर लक्षात येते की, भारतीय अर्थव्यवस्था आगेकूच करत आहे, असे गोयल म्हणाले. भारत सर्वात वेगवान अर्थव्यवस्था असल्याचे ते म्हणाले.

11 व्या वेळा रेपो दर जैसेथे

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पतधोरण समितीची बैठक जैसलमेर येथे झाली. 4 ते 6 डिसेंबर अशी पतधोरण समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दराची घोषणा केली. या दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय 4 विरुद्ध 2 या मताने घेतल्याचे त्यांनी सांगीतले. रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी 2023 पासून रेपो दरात कुठलाही बदल न करण्याचे धोरण आतापर्यंत कायम ठेवले आहे. रेपो दर 6.5 टक्के कायम ठेवण्यात आला आहे. खाद्यान्न महागाईमुळे आरबीआयला प्रत्येकवेळी निर्णय घेताना हात आखडता घ्यावा लागल्याचे दिसत आहे.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.