AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 8 December 2024 : सोने-चांदीची आनंदवार्ता, उतरला भाव, ग्राहकांचा मोठा फायदा

Gold Silver Rate Today 8 December 2024 : सोने-चांदीने आठवड्याच्या अखेरीस ग्राहकांना मोठा दिलासा दिला. या आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही धातुचे दर उतरले होते. तर मध्यंतरी त्यात वाढ झाली होती. अखरेच्या टप्प्यात भाव उतरल्याने सराफा बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडालेली दिसेल.

Gold Silver Rate Today 8 December 2024 : सोने-चांदीची आनंदवार्ता, उतरला भाव, ग्राहकांचा मोठा फायदा
सोने आणि चांदीचा भाव
| Updated on: Dec 08, 2024 | 8:28 AM
Share

लग्नसराईत सोने आणि चांदीत स्वस्ताई आल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. या आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही धातुत नरमाई आली होती. त्यानंतर मध्यंतरी किंमती वाढल्या. तर अखेरच्या सत्रात दोन्ही धातुत पुन्हा नरमाईचे सत्र दिसले. अखरेच्या टप्प्यात भाव उतरल्याने सराफा बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडालेली दिसेल. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कमोडिटी मार्केटमध्ये सोन्याचा वायदा 0.42 टक्क्यांनी वाढला. हा भाव 2,659.60 डॉलर प्रति औसवर पोहचला. अमेरिकेत वृद्धीदर वाढल्याने फेडरल रिझर्व्ह बँक आता व्याज दरात कपात करण्याची शक्यता कमी मानण्यात येत आहे. परिणाम सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता सराफा बाजारात अशा आहेत दोन्ही धातुच्या किंमती (Gold Silver Price Today 8 December 2024 )

सोन्याने दिला दिलासा

या आठवड्यात सोन्याच्या दरात चढउतार झाला. आठवड्याच्या सुरुवातीला 2 डिसेंबर रोजी सोने 650 रुपयांनी स्वस्त झाले. मंगळवारी सोने 430 रुपयांनी महागले. गुरूवारी 110 रुपयांनी किंमती वधारल्या. अखरेच्या सत्रात 6 डिसेंबर रोजी सोन्यात 250 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,770 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीचा भाव काय?

चांदीत स्वस्ताई आणि सुस्तावलेपणा दिसत आहे. या सोमवारी चांदी 500 रुपयांनी स्वस्त झाली. त्यानंतर चांदी सुस्तावली. तर 5 डिसेंबर रोजी चांदी 1 हजारांनी वधारली. त्यानंतर किंमतीत मोठा बदल झालेला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 92,000 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 76,187, 23 कॅरेट 75,882, 22 कॅरेट सोने 69,787 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 57,140 रुपये, 14 कॅरेट सोने 44,569 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 90,820 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप