Gold Silver Rate Today 13 April 2024 : सराफा बाजारात कर्फ्यू; सोने-चांदीने केली सर्वांची बोलती बंद; इतक्या वधारल्या किंमती

Gold Silver Rate Today 13 April 2024 : सोने आणि चांदीने या आठवड्यात पण दरवाढीची दंगल घडवली. यामध्ये सोने आणि चांदीने यापूर्वीच्या किंमतींना चितपट केले. ग्राहकांच्या आशेवर पाणी फिरवले. दरवाढीमुळे सोने आणि चांदी खरेदीचा उत्साह माळवला. आता अशा आहेत मौल्यवान धातूच्या किंमती...

Gold Silver Rate Today 13 April 2024 : सराफा बाजारात कर्फ्यू; सोने-चांदीने केली सर्वांची बोलती बंद; इतक्या वधारल्या किंमती
सोने आणि चांदीची तुफान फटकेबाजी
Follow us
| Updated on: Apr 13, 2024 | 8:47 AM

सोने आणि चांदीने या आठवड्यात पुन्हा दंगल घडवली. एप्रिल महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात सुद्धा सोने-चांदीसमोर किंमतींनी मान तुकवली. मार्च महिन्यानंतर एप्रिलने कहर केला. मौल्यवान धातूंमध्ये मोठी दरवाढ झाली. सोने या आठवड्यात 2,000 रुपयांनी वधारले तर चांदीने पण मोठी मुसंडी मारली. चांदी किलोमागे 3500 रुपयांनी वधारली. सोने लवकरच 75,000 रुपयांचा तर चांदी 90 हजारांचा टप्पा गाठण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. चीनने चांदीची जोरदार खरेदी सुरु केली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयांचे अवमूल्यन झाले. तर अमेरिकेत व्याज दरात कपातीचा परिणाम मौल्यवान धातूच्या किंमती वधारण्यात झाला. असा आहे सोने-चांदीचा भाव (Gold Silver Price Today 13 April 2024)

सोन्याची जोरदार आघाडी

एप्रिलच्या सुरुवातीच्या 10 दिवसांत सोन्याने मोठी आघाडी उघडली होती. तर या आठवड्यात पण सोन्याने आगेकूच सुरुच ठेवली. या आठवड्यात 8 एप्रिल रोजी 300 रुपयांनी किंमती वधारल्या. 9 एप्रिल रोजी 110 रुपयांची दरवाढ झाली. 10 एप्रिल रोजी 350 रुपयांनी भाव वधारले. 11 एप्रिल रोजी सोने 100 रुपयांनी तर 12 एप्रिल रोजी 1,000 रुपयांनी किंमती वधारल्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,350 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,460 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीची तुफान फटकेबाजी

एप्रिल महिन्यात चांदीने तुफान फटकेबाजी केली. पहिल्या 10 दिवसांत चांदी 8 हजारांनी वधारली. या आठवड्यात 8 एप्रिल रोजी चांदी 1 हजारांनी महागली. त्यानंतर चांदीने दरवाढीला ब्रेक दिला. 10 एप्रिल रोजी चांदी 1,000 रुपयांनी महागली. 12 एप्रिल रोजी चांदीने 1500 रुपयांची मुसंडी मारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 86,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदीने मुसंडी मारली. 24 कॅरेट सोने 73,174 रुपये, 23 कॅरेट 72,881 रुपये, 22 कॅरेट सोने 67,027 रुपये झाले.18 कॅरेट 54,881 रुपये, 14 कॅरेट सोने 42,807 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 83,819 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Non Stop LIVE Update
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.