AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने दिली आनंदवार्ता, मग चला की खरेदीला

Gold Silver Rate Today : उच्चांकावर पोहचलेल्या सोने-चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. या आठवड्यात दुसऱ्या दिवशी पण मौल्यवान धातूत पडझड सुरु होती. उच्चांकावर पोहचलेले सोने-चांदी आता पूर्वीच्या दराच्या जवळपास पोहचले आहे. अर्थात ग्राहकांचे अजूनही समाधान झालेले नाही. भाव कमी होण्याची ते वाट पाहत आहेत.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने दिली आनंदवार्ता, मग चला की खरेदीला
| Updated on: Dec 13, 2023 | 8:30 AM
Share

नवी दिल्ली | 13 डिसेंबर 2023 : ऐन लग्नसराईत सोने-चांदी महाग झाल्याने वधूकडील मंडळींच्या जीवाला घोर लागला होता. पण आता त्यांना दिलासा मिळाला आहे. उच्चांकावरुन सोने-चांदी माघारी फिरले आहेत. या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी पण मौल्यवान धातूत घसरण सुरु होती. गेल्या आठवड्यात या दरवाढीला मोठा ब्रेक लागला होता. सोने 65,000 रुपयांचा टप्पा ओलांडून आगेकूच करत होते. तर चांदीने पण 78,000 रुपयांचा टप्पा ओलांडला होता. या दोन दिवसांत मौल्यवान धातूत मोठी पडझड झाल्याने ग्राहकांना हायसे वाटले. असे आहेत सोने-चांदीचे दर (Gold Silver Price Today 13 December 2023)

दोन दिवसांत 400 रुपयांचा दिलासा

या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्यात 440 रुपयांची घसरण झाली. गेल्या आठवड्यात सोन्यात जवळपास 1500 रुपयांची घसरण झाली होती. सोमवारी, 11 आणि 12 डिसेंबर रोजी सोन्याच्या किंमती प्रत्येकी 220 रुपयांनी घसरल्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 56,900 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,060 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत स्वस्ताई

या आठवड्यात चांदीत स्वस्ताई आली. 5 डिसेंबर रोजी चांदीमध्ये 2 हजारांची घसरण झाली. तर 6 डिसेंबर रोजी 300 रुपयांनी भाव घसरले. 7 डिसेंबर रोजी चांदीत 1000 रुपयांची घसरण झाली होती. या आठवड्यात 11 डिसेंबर रोजी भाव 200 रुपयांनी कमी झाले. मंगळवारी किंमतीत 100 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 75,700 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 61,277 रुपये, 23 कॅरेट 61,032 रुपये, 22 कॅरेट सोने 56,130 रुपये झाले. 18 कॅरेट 45,958 रुपये, 14 कॅरेट सोने 35,847 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,575 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Follow Us
58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांची मागणी;मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यादीनाच्या अगदी एका
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यदिनाच्या अगदी एका दिवसापूर्वी... धक्कादायक माहितीचा खुलासा